Viral News: कर्जाचा हप्ता मागितला, अचानक देवी आली अंगात, महिलेनं भर कंपनीत असं काही केलं की.. VIDEO व्हायरल

Loan payment dispute viral video: लोनचा हप्ता मागितल्यानंतर फायनान्स कंपनीच्या कार्यालयात महिलेच्या अंगात देवी आली होती. ही घटना मध्य प्रदेशातील खांडवा येथे घडली आहे.
Viral News
Viral NewsSaam Tv News
Published On

एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोनचा हप्ता मागितल्यानंतर फायनान्स कंपनीच्या कार्यालयात महिलेच्या अंगात देवी आली होती. ही घटना मध्य प्रदेशातील खांडवा येथे घडली आहे. महिलेच्या अंगात देवी आल्यानंतर कंपनीतील कर्मचारी घाबरले होते. त्यांनी महिलेच्या हातावर कापूर पेटवला.

देवाच्या फोटोसमोर हात जोडून ती महिला कार्यालयातून निघून गेली होती. याचा व्हिडिओ एका व्यक्तीनं शुट केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करताच तुफान व्हायरल झाला आहे.

खांडवा येथील एका फायनान्स कंपनीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेकडे कर्जाचा हप्ता मागितला असता, त्याच वेळेस तिच्या अंगात देवी आली असल्याचं एका व्हिडिओतून समोर आलं आहे. त्या महिलेच्या अंगात देवी आल्यानंतर फायनान्स कंपनीच्या कार्यालयात गोंधळ उडाला होता.

Viral News
Santosh Deshmukh PM Report: आरोपींचे राक्षसी कृत्य, संतोष देशमुखांना अमानूष मारहाण; बरगडी,गुडघे-नडगी तोडली|VIDEO

आधी महिलेकडे कर्जाचा हप्ता भरण्यासाठी कर्मचारी विनंती करत होते. नंतर महिला आणि कर्मचांऱ्यामध्ये बाचाबाची झाली. काही वेळातच तिनं रौद्र रूप धारण केलं. तिच्या अंगात देवी आल्याचं तिनं सांगितलं. तिनं पेटवलेला कापूरही खाल्ला. यामुळे कंपनीतील कर्मचारी घाबरले होते. काही वेळेनंतर ती आपल्या घरी निघून गेली.

Viral News
Nanded Crime: नांदेडमध्ये बदलापूर कांड! १० वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शाळेतील सेवकानेच केलं कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिलेनं एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. पंरतू ती महिला वेळेवर हप्ता जमा करत नव्हती. फायनान्स कंपनीतील कर्मचारी सतत महिलेकडे पैशांची मागणी करत होते. मात्र, महिला टाळाटाळ करत होती. यानंतर ती फायनान्स कंपनीमध्ये गेली.

तिथं तिला कर्जाच्या हप्त्याबद्दल विचारणा केली असता, तिच्या अंगात देवी आली असल्याचं सांगितलं. तिनं हळू हळू रौद्र रूप धारण केलं. नंतर ती फायनान्स कंपनीमधून निघून गेली. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com