आपण एटीएम (ATM) मशिनला पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर लक्षात येतं आपण एटीएम कार्ड घरी विसरलं आहे. त्यामुळे आपले पैसे काढण्याचं राहुन जातं. कधी कधी आपल एटीएम कार्ड हरवलं जाते. यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो. पण आता यावर रिझर्व्ह बँकेने (RBI) पर्याय आणला आहे. देशातील सर्व बँकांच्या एटीएममधून कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा प्रस्तावित केली आहे. यामुळे आता आपल्याला विना एटीएम कार्ड एटीएम (ATM) मशिनमधून पैसे काढता येणार आहेत. (Card-less ATM Cash Withdrawal)
भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी चलनविषयक धोरण पुनरावलोकनाचा निर्णय जाहीर केला आहे.केंद्रीय बँकेने देशातील सर्व बँकांच्या एटीएममध्ये कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा प्रस्तावित केली आहे असं रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जाहीर केले आहे.
कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा युनिफाइड पेमेंट इंटरफेस किंवा UPI द्वारे प्रदान केली जाईल. सध्या, देशातील फक्त मर्यादित संख्येत एटीएम आणि बँका कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा देत आहेत, ती प्रत्येक बँकेवर वेगवेगळी अवलंबून असते, असं शक्तीकांत दास म्हणाले.
युपीआय पेमेंटचे देशात व्यवहार वाढले आहेत. त्याचप्रकारे आता एटीएममध्ये विना कार्ड पैसे काढण्याची सुविधा सुरु करण्याच्या सूचना दास यांनी दिल्या आहेत. दास यांनी बँकांना त्यांचे एटीएम नेटवर्क कार्ड-लेस कॅश काढण्याची प्रणाली बदलण्यास सांगितले आहे. या प्रणालीमध्ये, व्यवहारादरम्यान, युपीआय (UPI) द्वारे ग्राहकांची ओळख निश्चित केली जाईल. ही यंत्रणा इंटरऑपरेबल असेल.
यामुळे एटीएम कार्डद्वारे होणारी फसवणूक थांबणार आहे. यामुळे कार्ड क्लोनिंग, स्किमिंग, एटीएम मशिनशी छेडछाड इत्यादी गोष्टींनाही आळा बसणार आहे. यासाठी केंद्रीय बँक लवकरच एनपीसीआय एटीएम (NPCI) (ATM) नेटवर्क आणि बँकांना तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे.
Edited By- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.