Gold Ice Cream : अबब! तुम्ही खाणार का ही आईस्क्रीम? किंमत तब्बल 20 लाख रुपये

'फ्रोझन हाउट चॉकलेट आईस्क्रीम संडे' असे या आईस्क्रीमचे नाव आहे.
Gold Ice Cream
Gold Ice CreamSaam Tv

Viral Ice Cream News : तुम्ही कधी 20 लाखांचे आईस्क्रीम ऐकले किंवा पाहिले आहे का? गेल्या वर्षी जुलैमध्ये जगातील सर्वात महागड्या आईस्क्रीमची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. ज्याचे नाव आहे 'फ्रोझन हाउट चॉकलेट आईस्क्रीम संडे'.

मागच्या वर्षी याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. याची किंमत २५ हजार डॉलर्स म्हणजेच २० लाख रुपये आहे. या आईस्क्रीमच्या निर्मितीसाठी न्यूयॉर्कच्या यूफोरिया ज्वेलर्सने मदत केली होती. (Latest Marathi News)

Gold Ice Cream
Jalgaon News: पाचोऱ्यात शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू?; शेतात काम करताना आली चक्‍कर

आइस्क्रीमवर (Ice Cream) २३ कॅरेट सोन्याचे (Gold) वर्क लावण्यात आले होते. प्लेट १८ कॅरेट सोन्यापासून तयार केली होती. सोन्यापासून तयार केलेल्या चमचावर पांढरा मौल्यवान हिरा लावण्यात आला होता. आइस्क्रीम तयार करण्यासाठी जगातील उत्तम दर्जाच्या आणि महागड्या २८ कोकोजचा वापर करण्यात आला होता.

चीनमध्ये बनविली पहिली आइस्क्रीम

जग जिंकणाऱ्या सिकंदरच्या इतिहासात तसेच बायबलमध्येही याचे उल्लेख आढळतात. चीनमध्ये पाच हजार वर्षांपूर्वी जगातील पहिली आइस्क्रीम बनविल्याचा उल्लेख सापडतो. चिनी राजा तांग यांनी पहिल्यांदा दुधापासून बनविलेले आइस्क्रीम खाल्ले होते. भारतीय उपखंडात मुघल शासक हिंदुकुश पर्वतरागांमधून बर्फ मागवत असत. यापासून बनविलेले आइस्क्रीम सरबताप्रमाणे दरबारात पेश केले जात असे.

Gold Ice Cream
Samruddhi Mahamarag : समृद्धी महामार्गावरून 37 वाहनांना नो एन्ट्री; नेमकं कारण काय?

पाच वर्षांत ५०,८०० कोटींच्या घरात

एका संशोधनानुसार २०२२ मध्ये भारतात आइस्क्रीमच्या बाजारातील उलाढाल १९,४०० कोटींच्या घरात पोहोचली. पुढच्या पाच वर्षात २०२८ मध्ये हाच बाजार दुपटीपेक्षा अधिक वाढून ५०,८०० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. २०२२ मध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूच्या शहरांमध्ये आइस्क्रीम मोठ्या प्रमाणात खाल्ले गेले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com