संसर्गाचे प्रमाण घटल्याने दिल्लीला मिळणार निर्बंधातून दिलासा? CM केजरीवालांनी दिले संकेत

दिल्लीतील (Delhi) कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता येत्या काही दिवसांत निर्बंधातून सूट मिळू शकते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निर्बंध कमी करण्याचे संकेत दिले आहेत.
Restriction Relief In Delhi
Restriction Relief In DelhiSaam Tv
Published On

Corona Restriction In Delhi: संपूर्ण देशात कोरोनाचे प्रमाण वाढत चालले आहे या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी निर्बंध लादण्यात येत आहेत. याचप्रमाणे राजधानी दिल्लीत सुद्धा विकेंड लॉकडाऊन तसेच प्रायव्हेट ऑफिसेस पूर्णपणे बंद अशी काही नियमावली लागू करण्यात आली होती. परंतु आता दिल्लीतील (Delhi) कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता येत्या काही दिवसांत निर्बंधातून सूट मिळू शकते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निर्बंध कमी करण्याचे संकेत दिले आहेत. दिल्लीत संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की आम्ही आणि एलजी एकत्रितपणे शक्य तितक्या लवकर निर्बंध हटवू. (Will Delhi get relief from restrictions?)

याबद्दल वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी रोजी लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल (Anil Baijal) यांच्या अध्यक्षतेखाली DDMA (District Disaster Management Authority) ची बैठक होणार आहे. त्यात मुख्यमंत्री केजरीवालही (Arvind Kejriwal) सहभागी होऊ शकतात. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात, असे मानले जात आहे.

Restriction Relief In Delhi
धावत चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न, पाय घसरला आणि मग..., काळजाचा ठोका चुकवणारा Video

कोणत्या गोष्टींपासून दिलासा मिळणे अपेक्षित?

1. वीकेंड कर्फ्यू: कोरोनामुळे राजधानी दिल्लीत शनिवार व रविवार कर्फ्यू (Weekend Lockdown) लागू करण्यात आला आहे. हा कर्फ्यू काढण्यात येऊ शकतो. केजरीवाल सरकारनेही गेल्या आठवड्यात वीकेंड कर्फ्यू उठवण्याची शिफारस केली होती. मात्र, उपराज्यपालांनी त्यास मान्यता नाकारली होती.

हे देखील पहा-

2. दुकानांबाबत दिलासा: सध्या दिल्लीत विषम-विषम तत्त्वावर अनावश्यक दुकाने उघडली जात आहेत, यामध्येही दिलासा मिळू शकतो. संसर्ग कमी झाल्यानंतर दिल्लीत पुन्हा दररोज दुकाने उघडण्याची मागणी होत आहे. व्यापारी संघटनांकडूनही सम-विषम पद्धत रद्द करण्याची तीव्र मागणी करण्यात आली होती.

3. शाळा पुन्हा सुरु करणेबाबत : Omicron च्या प्रादुर्भावामुळे केल्यानंतर 29 डिसेंबरपासून दिल्लीत शाळा बंद करण्यात आल्या होत्या.परंतु याबाबद्दल वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या बैठकीत फेब्रुवारीपासून शाळा पुन्हा सुरू करण्याच्या विचारावरही विचार केला जाऊ शकतो. मुलांच्या लसीकरण स्थितीच्या आधारे, शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Restriction Relief In Delhi
औरंगाबाद: शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा क्रांतिचौकात विराजमान

दिल्लीला दिलासा का मिळेल?

कोरोनाची कमी प्रकरणे: दिल्लीत कोरोनाची (Corona) प्रकरणे झपाट्याने कमी होत आहेत. सोमवारी राजधानीत कोरोनाचे 5,760 रुग्ण आढळले आणि 30 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच एक दिवस आधी रविवारी, 9,197 प्रकरणे आणि 34 मृत्यू झाले.

संसर्ग दरात घट: तसेच सकारात्मकतेचा दरही सातत्याने कमी होत आहे. 15 जानेवारी रोजी दिल्लीतील संसर्ग दर 30.6 टक्क्यांवर पोहोचला होता. सोमवारी दिल्लीत संसर्ग दर 11.79% नोंदवला गेला. सीएम केजरीवाल यांनी सांगितले की आज दिल्लीमध्ये सकारात्मकता दर 10% च्या आसपास असू शकतो. तसेच दिल्लीच्या रुग्णालयांमध्येही गर्दी कमी होऊ लागल्याने दिल्लीतील निर्बंधांमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com