धावत चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न, पाय घसरला आणि मग..., काळजाचा ठोका चुकवणारा Video

एक प्रवासी मुंबईच्या वसई रोड स्थानकावर धावत धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान त्याच्यासोबत जे काही घडला ते कॅमेरात कैद झालं आहे.
Man Trying To Catch Running Train
Man Trying To Catch Running TrainTwitter/@WesternRly
Published On

मुंबई : भारतीय रेल्वे (Indian Railway) आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तयार असते, परंतु कधीकधी काही विचित्र घटना समोर येत असतात. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) देखील तयार करण्यात आले आहे. आरपीएफने अनेकदा प्रवाशांचे प्राण वाचवलेले आपण पहिले आहेत. नुकतेच महाराष्ट्रात आरपीएफच्या जवानांनी ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाचा जीव वाचवला आहे. (Viral Video)

वास्तविक, हा प्रवासी मुंबईच्या वसई रोड स्थानकावर (Vasai Road Station) धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video On Social Media) होत आहे. व्हिडिओत दिसून आल्या प्रमाणे, आरपीएफचे हवालदार रामेंद्र कुमार यांनी प्रवाशाला वाचवण्याची तत्परता दाखवली आणि धाव घेत त्याला सुखरूप मागे ओढत त्याचे जीव वाचवले. पश्चिम रेल्वेने (Western Railway) या घटनेशी संबंधित व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. (Man Trying To Catch Running Train)

व्हिडिओ शेअर करताना पश्चिम रेल्वेने लिहिले की, “आरपीएफ कॉन्स्टेबल रामेंद्र कुमार यांनी मुंबईच्या वसई रोड स्टेशनवर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात पडलेल्या प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी तत्परता दाखवली. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये."

Man Trying To Catch Running Train
औरंगाबाद: शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा क्रांतिचौकात विराजमान

या व्हिडिओला काही तासांत अडीच हजारांहून अधिक व्ह्यूज (Views) मिळाले आहेत. हा २४ सेकंदांचा व्हिडिओ इतर ट्विटर हँडलवरही अपलोड करण्यात आला आहे यामुळे तो व्हायरल झाला आहे. तसेच लोक आरपीएफ जवानाचे खूप कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com