Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये वारंवार का होतेय ढगफुटी? उत्तरकाशीमधील व्हिडिओ धडकी भरवणारा

Uttarakhand Cloudburst Flood Video : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झाली. याचा धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तराखंडमध्येच ढगफुटीच्या घटना वारंवार का घडतात? देशातील कोणकोणत्या भागात ढगफुटीचा सर्वाधिक धोका आहे हे जाणून घेऊयात.
उत्तराखंडमध्ये वारंवार ढगफुटी का होतेय? काय आहेत कारणं
Uttarakhand Cloudburst Flood Videosaam tv
Published On

uttarkashi cloudburst video august 2025 : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील ढगफुटीचा व्हिडिओ बघून काळजाचा थरकाप उडेल. ढगफुटी झाल्यानंतर काही सेकंदातच होत्याचं नव्हतं झालं. पाण्याचा मोठा प्रवाह आणि डोंगरावरून आलेल्या दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली घरं, हॉटेल क्षणात गुडुप झाले. आतापर्यंत यात चार नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १२ हून अधिक नागरिक बेपत्ता झाले आहेत. उत्तरकाशीतल्या धराली गावावर हे नैसर्गिक संकट कोसळलं. भागीरथी नदीच्या परिसरात ही दुर्घटना घडली. काही सेकंदातच सारं काही उद्ध्वस्त झालं. अनेकांच्या संसाराची आणि त्या घरासोबत बघितलेली स्वप्ने क्षणांत वाहून गेली. (Cloudburst rescue operation in Uttarakhand) आता तिथं मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश ही अशी राज्ये आहेत की तिथं पावसाळ्यात नेहमी ढगफुटीसारख्या महाभयंकर घटना घडत असतात. वारंवार याच भागात ढगफुटी का होते? देशातील कोणकोणत्या भागात ढगफुटीसारख्या घटनांचा सर्वाधिक धोका आहे, हे जाणून घेऊयात.

ढगफुटी का होते?

हवामानविषयक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुलनेने लहान असलेल्या भागात १० सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो, त्या घटनेला ढगफुटी म्हटलं जातं. कधी कधी तर एकाच भागात वारंवार अशा ढगफुटीच्या घटना घडतात.

ढगफुटी ही दोन कारणांमुळं होत असते. एक म्हणजे तेथील भौगोलिक परिस्थिती आणि दुसरं म्हणजे हवामान. उष्ण हवा आर्द्रतेनं भरलेल्या ढगांना वर घेऊन वेगानं मार्गक्रमण करतात. हे ढग थंड हवेच्या संपर्कात येतात आणि ते सुद्धा थंड होतात. त्यावेळी ढगांमधील पाण्याचं प्रचंड वेगात थेंबांमध्ये रुपांतर होतं. अब्जावधी थेंब वेगानं तयार होत असतात आणि त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळं सर्वाधिक नुकसान होतं. मुसळधार पाऊस अक्राळविक्राळ रूप धारण करतो. रौद्ररुप धारण केलेल्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात डोंगरावरील दगड-मातीचा ढिगाराही वाहून नेला जातो. जर हवेत आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढली तर ढगफुटी होण्याची शक्यता अधिक वाढते. कमी वेगानं मार्गक्रमण करणारा ढग एखाद्या भागात एकाच जागी थांबला आणि तो पुढे मार्गक्रमण करत नेसल तर तिथं कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते.

पावसाळ्यात आर्द्रतायुक्त वारे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून हिमालयाच्या दिशेने वाहू लागतात. ते उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील डोंगरांना धडकतात. त्यानंतर वेगाने वरच्या दिशेने मार्गक्रमण करतात. उंचावर तापमान कमी झाल्यानं ते घन होतात आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील डोंगरांमध्ये अंतर कमी असतं. त्या ठिकाणी हे वादळी ढग अडकतात. बराच वेळ एकाच जागी थांबतात. लहान भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळं ढगफुटीसारख्या घटना या ठिकाणी वारंवार घडत असतात.

उत्तराखंडमध्ये वारंवार ढगफुटी का होतेय? काय आहेत कारणं
Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीमध्ये मध्यरात्री आभाळ फाटलं, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी, १७ जण बेपत्ता

भारतात ढगफुटीच्या घटना साधारणपणे हिमालय आणि पश्चिम घाट क्षेत्रात घडतात. त्यात मग जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश आहेत. मात्र, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांत ढगफुटीसारख्या घटनांचा धोका तुलनेने खूप कमी असतो. मान्सूनपूर्व आणि पावसाळ्यात या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. मे आणि ऑगस्ट या दरम्यानच्या काळात या घटना वाढतात, असं सांगितलं जातं.

उत्तराखंडमध्ये वारंवार ढगफुटी का होतेय? काय आहेत कारणं
Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीमध्ये मध्यरात्री आभाळ फाटलं, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी, १७ जण बेपत्ता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com