17 labourers missing in Uttarkashi cloudburst incident on Yamunotri highway : मागील दोन ते तीन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. उत्तरकाशीमध्ये मध्यरात्री ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १७ कामगार बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. यमुनोत्री महामार्गावर पालीगाड ओजरी डाबरकोट दरम्यान ढगफुटी झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या दुर्देवी घटनेची माहिती समजताच SDRF, स्थानिक पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य वेगात सुरू आहे.
रिपोर्ट्सनुसार, ही घटना मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या दरम्यान घडली. स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या TIO ला माहितीनुसार, उत्तरकाशीमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी रात्री उशीरा यमुनोत्री महामार्गावर पालीगाड ओजरी डाबरकोट दरम्यान ढगफुटी झाली. त्यानंतर एसडीआरएफ, पोलिस आणि महसूल विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. चौकशीदरम्यान, काही कामगार बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे.
उत्तरकाशीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहे. बचावपथकाकडून मलब्याखाली अडकलेल्या मजुरांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक प्रशासन, फायर ब्रिगेड आणि आरोग्य पथकही घटनास्थळी दाखल आहे. मुख्यमंत्रीही या घटनेकडे बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे समोर आले आहे. बडकोटमध्ये यमुनोत्री परिसरात मध्यरात्री उशिरा आलेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीही झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. धो धो पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. कोसळधारामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. यमुनोत्री राज्यमार्गावर पावसामुळे खराब झालाय, त्यामुळे अनेकजणांचा संपर्क तुटला आहे. पोलीस आणि एनटीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले असून पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.