मृत्यूनंतर मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. मात्र चीनमध्ये लोक महागड्या कबरीच्या परंपरेपासून दूर जातायेत.चीनचे दिवंगत माजी राष्ट्रपती जियांग झेमिन यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांना समाधीस्थळ मिळणार नाही. ते आधुनिक विचारसरणीचे व्यक्ती होते. म्हणून 2022 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नंतर राख शांघायच्या समुद्रात विसर्जित करण्यात आली. जमिनीची किंवा स्मशानभूमीची गरज भासली नाही. जियांग यांच्या कुटुंबानं घेतलेल्या या निर्णयाचं अनुकरण संपूर्ण शांघायमध्ये इतरांनी केलंय. कारण दफन करण्यासाठी जमीन शिल्लक नाही. शांघाय प्रशासनाननं जे लोक आपल्या नातेवाईकांची कबर न बांधता राख समुद्रात किंवा झाडांखाली सोडतील त्यांना 37 हजार युआन देण्याची घोषणा केलीय. त्यामुळे समुद्रात मृतदेहाची राख पाण्यात सोडण्याचं प्रमाण वाढलंय
2021 पूर्वी चिनी कुटुंबांकडून मृतांच्या कबरींवर खूप पैसे खर्च केले जात होते. मात्र जियांग यांच्या अंत्यसंस्कारामुळे चिनी दृष्टिकोन बदलू लागलाय. लोक मोठ्या कबरींना मागासलेली परंपरा आणि चांगल्या जमिनीचा अपव्यय मानू लागले आहेत. शहरांमध्ये दफनभूमीसाठी जागा शिल्लक नाही. सत्ताधारी पक्षानं अधिकृत स्मशानभूमीबाहेर कबरी बांधण्यास बंदी घातलीय. चीन वेगानं वृद्धत्वाकडे झुकू लागलाय. त्यामुळे मृत्यूंचं प्रमाण वाढतय.
परिणामी, महागड्या कबरीची देखभाल करणे कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या कठीण होतय चिनी प्रशासन या व्यक्तींना आर्थिक प्रोत्साहन आणि इतर पर्याय देतय. त्यामुळे येत्या काही वर्षात चीनमध्ये स्मशानभूमींत मृतदेहांची कबर बांधण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात घटलेलं असेल हे निश्चित..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.