Lok Sabha Speaker: कोण होणार लोकसभेचे नवीन अध्यक्ष? आंध्र प्रदेशातील या नेत्याचं नाव आघाडीवर

Parliament Monsoon Session 2024: मोदी सरकार 3.0 चे संसदेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरु होणार असून 26 जून रोजी नवीन लोकसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
कोण होणार लोकसभेचे नवीन अध्यक्ष, आंध्र प्रदेशातील या नेत्याचं नाव आघाडीवर
Lok Sabha Speaker ElectionSaam Tv

मोदी सरकार 3.0 चे संसदेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरु होणार आहे. याच्याच दोन दिवसांनी म्हणजेच 26 जून रोजी नवीन लोकसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात अनेक नावांची चर्चा होत आहे. यामध्ये मागील टर्ममध्ये अध्यक्ष राहिलेल्या ओम बिर्ला यांचाही समावेश आहे.

याशिवाय भत्रीहरी महताब आणि डी पुरंदेश्वरी हे देखील शर्यतीत आहेत. हे दोन्ही नेते आंध्र प्रदेश आणि ओडिशाती आहेत. एनडीए सरकार स्थापनात या दनही नेत्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. जर आपण महता यांच्या बबद्दल बोललो तर ते ओडिशाचे एक प्रसिद्ध नेते आहेत. नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर पुरंदेश्वरी या पक्षाच्या आंध्र प्रदेश राज्याच्या अध्यक्षा आहेत.

कोण होणार लोकसभेचे नवीन अध्यक्ष, आंध्र प्रदेशातील या नेत्याचं नाव आघाडीवर
VIDEO: 'लोकसभा निकालात मोठी डील, निवडणूकीत आदर्श घोटाळा', संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

ओडिशा आणि आंध्र प्रदेश ही दोन्ही राज्ये अशी आहेत जिथे भाजपने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. भाजपने ओडिशातील बीजेडीची 24 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, 26 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या नवीन अध्यक्षांचा नावाचा प्रस्ताव मांडणार आहेत.

दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. रिजिजू यांनी 10 राजाजी मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी खरगे यांची भेट घेतली. शिष्टाचार म्हणून ही भेट घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

कोण होणार लोकसभेचे नवीन अध्यक्ष, आंध्र प्रदेशातील या नेत्याचं नाव आघाडीवर
VIDEO: जरांगेंना रेड कार्पेट, ओबीसींना दुजाभाव, राज्यात सरकारपुरस्कृत कुणबी घोटाळा; लक्ष्मण हाकेंच्या आरोपांनी खळबळ

गेल्या आठवड्यात मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताना रिजिजू म्हणाले होते की, सरकार किंवा विरोधकांनी आकड्यांच्या आधारे एकमेकांचा अपमान करण्याची गरज नाही. संसदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सर्वांशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होणार असून त्यादरम्यान कनिष्ठ सभागृहातील नवीन सदस्य शपथ घेतील आणि सभापतींची निवड केली जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com