Who is Petal Gahlot: जगासमोर पाकच्या पंतप्रधानांचे तोंड बंद केलं, खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गहलोत कोण आहेत?

IFS Petal Gahlot Story: आयएफएस अधिकारी पेटल गहलोत या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत पाकिस्तानची चांगलीच कानउघडणी केली आहे.
Petal Gahlot
Petal GahlotSaam Tv
Published On
Summary

कोण आहेत पेटल गहलोत?

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत पाकिस्तानला सुनावले खडेबोल

शाहबाज शरीफ यांचे खोटे दावे खोडून काढले

आयएफएस अधकारी पेटल गहलोत या सध्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना खडेबोल सुनावले आहेत. शाहबाज शरीफ यांना भारताविरोधात पुन्हा एकदा गरळ ओकळी होती. त्याचदरम्यान, सभेत पेटल यांनी पाकिस्तानचा खरा चेहरा सर्वांसमोर उघड केला. त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि सिंधू पाणी कराबाबतचे केलेले खोटे दावे खोडून काढले आहेत.

Petal Gahlot
Success Story: बी.टेकनंतर बँकेत नोकरी, पुन्हा UPSC ची तयारी; IPS शांभवी मिश्रा यांचा प्रवास

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी सांगितले की, अध्यक्ष महोदय, या सभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी नाटके केली. त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचा पुरस्कार केला आहे.जो त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा बिंदू आहे. पाकिस्तानचे कोणत्याही प्रकारचे नाटक हे खरं वास्तव लपवू शकल्या नाहीत, असं त्या म्हणाल्या.

कोण आहेत पेटल गहलोत? (Who is Patel Gehlot)

पटेल गहलोत यांनी पाकिस्तानला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. आंतरराष्ट्रीय बैठकीत पाकिस्तानचा मुखवटा फाडला आहे. पेटल गहलोत या भारतीय विदेश सेवेत कार्यरत आहेत.

पेटल गहलोत या मूळच्या दिल्लीच्या आहेत. त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून राजशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. यानंतर दिल्लीतील लेडी श्री राम कॉलेज फॉर वूमन येथून पदवी प्राप्त केली.यानंतर त्यांनी २०१४ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांना ९६ रँक मिळाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये त्या भारतीय विदेश सेवामध्ये कार्यरत झाल्या. त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेत जाण्याआधी परराष्ट्र मंत्रालयाच्या युरोपियन वेस्टर्न विभागात सहसचिव म्हणून काम केले होते.

Petal Gahlot
Success Story: जिद्द! घर, कुटुंब सांभाळत लग्नानंतर क्रॅक केली UPSC; IAS बी चंद्रकला यांचा प्रेरणादायी प्रवास

पेटल गहलोत जपतात आवड

पेटल गहलोत यांना संगीताचीदेखील आवड आहे. त्या प्रसिद्ध गिटार वादकदेखील आहेत. त्यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होताय. यामध्ये त्यांनी इटलीची प्रसिद्ध गायक गीत बेला सियाओ यांचे गाणे गायले होते.

Petal Gahlot
Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com