Nirmala Sitharaman Son In Law: कोण आहेत निर्मला सीतारामण यांचे जावई, पीएम मोदींचे आहेत खूपच खास

Who Is Pratik Doshi: कर्नाटकमध्ये गुरुवारी परकला वांगमयी आणि प्रतीक दोशी (Pratik Doshi) यांचा विवाह सोहळा पार पडला.
Nirmala Sitharaman Daughter Wedding
Nirmala Sitharaman Daughter WeddingSaam Tv
Published On

Nirmala Sitharaman Daughter Wedding: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांची मुलगी परकला वांगमयीचे नुकताच लग्न झाले. कर्नाटकमध्ये गुरुवारी परकला वांगमयी आणि प्रतीक दोशी (Pratik Doshi) यांचा विवाह सोहळा पार पडला. हा विवाहसोहळा अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत झाला. या लग्नाला दोन्ही कुटुंबीयातील फक्त जवळच्या व्यक्ती उपस्थित होत्या.

Nirmala Sitharaman Daughter Wedding
Loksabha Election: यावर्षी विधानसभांसोबतच लोकसभा निवडणुका होणार?, भाजपकडून विचार सुरू

7 जून रोजी लग्नगाठीत अडकलेल्या परकलाने बंगळुरू येथील एका हॉटेलमध्ये कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. यावेळी एकही व्हीआयपी किंवा राजकीय व्यक्तिमत्व उपस्थित नव्हते. सध्या निर्मला सीतारामण यांच्या मुलीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच हे लग्न सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. सर्वांना प्रश्न पडला आहे निर्मला सीतारामण यांचा जावाई कोण आहे. तर आपण जाणून घेणार आहोत सीतारामण यांच्या जावई प्रतीक दोषींबद्दल....

निर्मला सीतारामण यांची मुलगी परकला आणि प्रतीक दोशी यांचा विवाह सोहळा ब्राह्मण परंपरेनुसार उडुपी अदमारू मठाच्या संतांच्या उपस्थितीत पार पडला. लग्नामध्ये परकालाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती आणि हिरव्या रंगाच्या ब्लाउज घातला होता. तर प्रतीकने पांढरा पंच आणि शाल परिधान केली होती. या खास प्रसंगी निर्मला सीतारामन यांनी निळ्या रंगाची साडी नेसली होती.

अर्थमंत्र्यांची मुलगी परकला वांगमयी मिंट लाउंजच्या बुक्स अँड कल्चर विभागासाठी फीचर रायटर म्हणून काम करते. तर जावई प्रतीक दोशी 2014 पासून पंतप्रधान कार्यालयामध्ये काम करतात. प्रतीक दोशी हे मूळचे गुजरातचे असून ते पंतप्रधान कार्यालयामध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून काम करतात.

Nirmala Sitharaman Daughter Wedding
MP Girl Fell Into Borewell Update: आयुष्याची लढाई हरली! 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सृष्टीचा मृत्यू

2014 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा प्रतीक दोशी यांचीही येथे बदली झाली होती. 2019 मध्ये त्यांना सहसचिव पदावर बढती देण्यात आली होती. प्रतीक दोशी यांनी सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रतीक दोशी यांनी गुजरातच्या सीएमओमध्ये संशोधन सहाय्यक म्हणूनही काम केले आहे.

पीएमओच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक दोशी हे पीएमओच्या रिसर्च आणि स्ट्रॅटेजी विंगचे काम पाहतात. ते कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय नाहीत. प्रतीक दोशी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूपच खास आहेत. पंतप्रधान मोदी कोणत्याही अधिकाऱ्यांच्या बदलीचे निर्णय घेतात तेव्हा प्रतीक दोशी हे त्यांना सगळी माहिती देऊन निर्णय घेण्यास मदत करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com