
नेपाळमध्ये Gen Z आंदोलनानंतर सत्ताबदल
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कुलमन घिसिंग आघाडीवर
बालेन शाह आणि सुशिला कार्कींची नावं मागे पडली
जेन झीची घिसिंग यांना का आहे पहिली पसंती?
Who is Kulman Ghising Nepal next PM : 'जेन झी'चा उद्रेक झाला आणि नेपाळमधील सत्ता उलथवून टाकली. प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार आणि सरकारचा हुकूमशाही कारभार याविरोधात तरुणाई पेटून उठली. सरकारनं संताप व्यक्त करण्याचे व्यासपीठ अर्थात सोशल मीडियावरही बंदी घातली. हेच निमित्त ठरलं आणि सोशल मीडियावर सरकारविरोधात राग काढणारी तरूण मंडळी रस्त्यावर उतरली. हिंसक आंदोलनं झाली. प्रचंड जाळपोळ झाली. आता नेपाळ थोडं शांत होतंय. आता जेन झीकडून नवे सरकार स्थापन्याच्या हालचालींना वेग आलाय.
हंगामी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत रोज नवे नाव जोडले जात आहे. काठमांडूचे महापौर बालेन शाह, माजी सीजेआय सुशिला कार्की यांच्यानंतर आता कुलमन घिसिंग हे नाव चर्चेत आहे. बालेन यांनी स्वतःच आपलं नाव मागे घेतल्याचं बोललं जातंय. तर कार्की यांना त्यांच्या वयाचा अडथळा येत आहे. त्यामुळं घिसिंग हे नाव सध्या तरी आघाडीवर आहे.
कुलमन घिसिंग हे नाव अचानक चर्चेत आलंय. नेपाळच्या वीज वितरण विभागाचे ते माजी प्रमुख आहेत. वीज व्यवस्थेतील सुधारणेचे श्रेय त्यांना दिले जात आहे. त्यांच्या नेतृत्वातच नेपाळमधील विजेच्या कमतरतेचा प्रश्न सुटल्याचं मानलं जात आहे. यामुळे त्यांना तरुणाईची पसंती मिळत आहे.
घिसिंग यांनी हंगामी सरकारच्या स्थापनेचीही मागणी केलीय. त्यात स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती असायला हवी आणि त्यात जेन झींनाही सहभागी करून घ्यावे असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच तात्काळ निवडणुका घोषित कराव्यात, असेही त्यांनी सूचवले आहे. त्यामुळेच ते जेन झी गटाचे सगळ्यात फेव्हरिट नेते ठरत आहेत. हंगामी सरकारचं नेतृत्व घिसिंग यांनी करावं, असे आता जेन झी गटाला वाटत आहे.
याआधी माजी सीजेआय सुशिला कार्की यांचं नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर होतं. पण जेन झीच्या एका गटाचा विरोध झाल्यानंतर हे नाव मागे पडलं आहे. कार्की यांचं वय आता ७३ आहे, त्यामुळं नेपाळचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यास जेन झी उत्सुक नाहीये. त्यामुळे त्यांच्या नावाऐवजी आता कुलमन घिसिंग यांच्या नावाला जेन झीच्या गटाने पसंती दिली आहे. अद्याप यासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही.
कुलमन घिसिंग यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९७० रोजी बेथन, रामेछापमध्ये झाला.
भारतातील जमशेदपूरमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगपर्यंतचं शिक्षण
त्यानंतर नेपाळच्या पूलचौक इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं.
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, त्यांनी नेतृत्व कौशल्यासाठी एमबीए पदवी घेतली
देशाच्या वीज वितरण विभागाचे ते माजी प्रमुख आहेत.
सन १९९४ मध्ये एनईएमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून कारकिर्दीला सुरुवात
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.