WhatsApp
WhatsAppSaam Tv

स्क्रिनशॉट्स ब्लॉक करण्यापासून ते ऑनलाइन स्टेटस लपवण्यापर्यंत, WhatsAppने आणले ३ फिचर्स!

व्हॉट्सअॅपने लवकरच आपल्या वापरकर्त्यांसाठी तीन नवे सुरक्षेचे फिचर्स आणण्याचे जाहीर केले आहे.

व्हॉट्सअॅपने (WhatsApp) लवकरच आपल्या वापरकर्त्यांसाठी तीन नवे सुरक्षेचे फिचर्स आणण्याचे जाहीर केले आहे. मार्क झुकरबर्गने फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच, ट्विटरवर WhatsApp ने पोस्ट केली आहे. यात तीन नवे फिचर्स येणार असल्याचे जाहीर केले आहे. यात 'ऑनलाइन असल्याचे तसेच स्टेटस पाहणाऱ्यांसाठी स्क्रीनशॉट घेता येणार नाही. यासाठी नवे सेटींग सुरू करण्यात येणार आहे.

WhatsApp या महिन्यात एक नवे फीचर आणणार आहे, यामध्ये युजर्संना कोण ऑनलाइन दिसेल हे पाहण्याचा अधिकार असेल, म्हणजेच आता यूजर्स ऑनलाइन कोण पाहू शकतील यासाठी वेगवेगळे लॉक सेट करू शकतील.

WhatsApp
Maharastra Politics : शिंदे सरकारविरोधात राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

व्हॉट्सअॅपने (WhatsApp) नुकतेच 'व्ह्यू वन्स मेसेज' फीचर आणले आहे, ज्याद्वारे मेसेज एकदाच वाचता येतो आणि त्यानंतर तो आपोआप गायब होतो. त्यांनी पाठवलेल्या मेसेजचे डिजिटल रेकॉर्ड ठेवू शकत नाही. पण अशा मेसेजचे स्क्रीनशॉट घेतल्याच्या काही तक्रारी आल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने त्यात सुधारणा करण्यासाठी नवीन फीचर आणण्याची तयारी केली आहे.

व्हॉट्सअॅप आता अतिरिक्त सुरक्षेसाठी व्ह्यू वन्स मेसेजचे स्क्रीनशॉट रोखण्यासाठी काम करत आहे. या फीचरची सध्या चाचणी सुरू असून लवकरच युजर्ससाठी आणले जाणार आहे, असं यात म्हटले आहे.

WhatsApp
Langya Henipavirus: कोरोनानंतर आता नव्या व्हायरसची धास्ती; चीनमध्ये 35 जणांना लागण

या महिन्यात ते एक सुरक्षेचे फिचर आणत आहेत. ज्यांना एखाद्या ग्रुपमधून बाहेर पडायचे आहे, त्यांना कुणालाही न समजता बाहेर पडता येऊ शकते. याचा अर्थ असा की तुम्ही ग्रुप सोडलात तर कुणालाही नोटिफिकेशन मिळणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com