Maharastra Politics : शिंदे सरकारविरोधात राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

आज राष्ट्रवादीकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
Eknath shinde , Mahesh Shinde , Ramraje Naik Nimbalkar, Satara , Koregoan, NCP, Shivsena, BJP
Eknath shinde , Mahesh Shinde , Ramraje Naik Nimbalkar, Satara , Koregoan, NCP, Shivsena, BJPSaam Tv
Published On

मुंबई : एकीकडे शिंदे सरकारच्या (Eknath Shinde) मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार पार पडला असतानाच, दुसरीकडे राजकीय वर्तुळात एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) आता न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही शिंदे-फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्या असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आज राष्ट्रवादीकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. (NCP vs Eknath Shinde Latest News)

Eknath shinde , Mahesh Shinde , Ramraje Naik Nimbalkar, Satara , Koregoan, NCP, Shivsena, BJP
बेस्ट बसचे अचानक ब्रेक फेल; रिक्षाला फरफटत नेलं, टेम्पोलाही ठोकलं, पाहा VIDEO

पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोर्टात धाव घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका वेळेत घ्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वी सुप्रीम कोर्टात राज्य सरकारला निवडणूका वेळेत घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम सुद्धा घोषित करण्यात आला होता.

Eknath shinde , Mahesh Shinde , Ramraje Naik Nimbalkar, Satara , Koregoan, NCP, Shivsena, BJP
संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्याने एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली; चर्चांना उधाण

दरम्यान, नव्याने ओबीसी आरक्षणाचा निकाल आल्यानंतर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. राज्य सरकारने वार्ड पुन:रचनेचा घाट घातल्याचा आरोपही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. या निवडणुका वेळेत घ्यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रसेचे शिष्टमंडळदेखील दिल्लीत दाखल झालं आहे.

गेल्या महिन्यात ओबीसी आरक्षणाच्या निकालावेळी १५ दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन करत या निवडणुका आणखी सात महिले पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. हा सर्वोच न्यायालयाचा अवमान आहे, त्यामुळे आम्ही ही याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com