WhatsApp Down: जगभरात व्हॉट्सअ‍ॅप ठप्प, ट्विटरवर युजर्स करत आहेत संताप व्यक्त

WhatsApp News: जगभरात व्हॉट्सअ‍ॅप ठप्प झाले आहे. यामुळे युजर्सला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
WhatsApp Down
WhatsApp DownSaam Tv
Published On

WhatsApp Down:

सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनलेल्या डिजिटल मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सॲप जगभरात ठप्प झालं आहे. बुधवारी रात्री अचानक जगभरात व्हॉट्सॲप बंद पडले. यानंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी मेसेज पाठवता येत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

फेसबुकची मूळ कंपनी मेटा या लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपच्या सेवेत रात्री 11.45 वाजता समस्या निर्माण झाली. मात्र अनेक युजर्सनी असेही म्हटले आहे की, मेसेज रिसिव्ह करण्यात आणि पाठवण्यात कोणतीही अडचण येत नाही.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

WhatsApp Down
Ola Solo: जबरदस्त! रायडरशिवाय धावते ही इलेक्ट्रिक स्कूटर, Ola घेऊन येत आहे जगातील पहिली ऑटोनॉमस EV

यातच अनेक युजर्सला व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये लॉग इन करण्यात अडचणीचा सामना करावा लागत आहे. व्हॉट्सअ‍ॅप ठप्प झाल्यामुळे अनेक युजर्स ट्विटरवर पोस्ट करत आपला संताप व्यक्त करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप ठप्प होण्याचं नेमकं काय कारण आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही.  (Latest Marathi News)

वेबविश्वातील माहिती ठेवणाऱ्या Downdetector या लोकप्रिय वेबसाइटनेही व्हॉट्सॲप सेवेतीत अडथळा निर्माण झाल्याची माहिती दिली. Downdetector ने एक आलेख देखील जारी केला आहे, जो WhatsApp च्या सेवेतील समस्यांमुळे सतत प्रयत्न करणाऱ्या युजर्स संख्येत अचानक झालेली वाढ दर्शवितो.

WhatsApp Down
Vasant More Latest News: खासदार व्हायचंय! पत्रकार परिषदेत वसंत मोरेंनी थेटच सांगितलं | Marathi News

दरम्यान, काही काळ बंद राहिल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपची सेवा पुन्हा सुरु झाली आहे. जगभरात जवळपास अर्धा तास व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बंद होती. मात्र आता पुन्हा व्हॉट्सअ‍ॅप आधी सारखं युजर्सला वापरता येत आहे. मात्र अद्यापही व्हॉट्सअ‍ॅप सेवा का ठप्प झाली होती, हे समजू शकलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com