Mimicry Row: 'व्हिडिओ बनवण्यात गैर काय?', मिमिक्रीच्या वादावर सिब्बल यांनी केलं राहुल गांधी यांचं समर्थन

Jagdeep Dhankar Mimicry Incident: राहुल गांधी संसदेच्या संकुलात आपल्या मोबाईल फोनवरून बॅनर्जींच्या मिमिक्रीचा व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसले. आता राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींचा बचाव केला आहे.
Kapil Sibal On Mimicry Row
Kapil Sibal On Mimicry RowSaam Tv
Published On

Kapil Sibal On Mimicry Row:

तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्यावरून जोरदार वाद सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने हा उपराष्ट्रपतींचा अपमान असल्याचे म्हटले असून याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे.

राहुल गांधी संसदेच्या संकुलात आपल्या मोबाईल फोनवरून बॅनर्जींच्या मिमिक्रीचा व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसले. आता राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींचा बचाव केला आहे. सिब्बल म्हणालेकी, व्हिडिओ बनवण्यात गैर काय? एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, 'राहुलने स्वत: व्हिडिओच्या प्रमोशनसाठी कोणत्याही प्लॅटफॉर्मचा वापर केला नाही.' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kapil Sibal On Mimicry Row
Lok Sabha Survey: राज्यात मोदींचीच हवा; कोणताही सर्व्हे असो, आम्ही लोकसभेच्या 40 जागा जिकणार: देवेंद्र फडणवीस

कपिल सिब्बल म्हणाले, 'कोणी व्हिडिओ बनवू शकत नाही का? जर कोणी मिमिक्री करत असेल तर त्याला व्हिडिओ बनवण्याचा अधिकार आहे. शेवटी यात चूक काय? यात काही गैर नाही.  (Latest Marathi News)

ते म्हणाले की, त्यांनी (राहुल गांधी) हा व्हिडिओ कोणत्याही व्यासपीठावर शेअर केलेला नाही. ज्याने मिमिक्री केली त्याने काही तरी विचार करून केली असावी. मी यावर भाष्य करणार नाही. ते म्हणाले, 'मी असतो तर कदाचित मी हे केले नसते, पण हा त्यांचा अधिकार आहे. हा विषय राजकारणाशी संबंधित नाही. संविधानिक पदांचा अवमान करून लोकशाही नष्ट करण्याचे काम केले जात आहे.

Kapil Sibal On Mimicry Row
Aaditya Thackeray: '3 महिने झाले, मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्ग तयार असूनही उद्घाटन का नाही?', आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

दरम्यान, कल्याण बॅनर्जी यांनी रविवारीही उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या मिक्रीची पुनरावृत्ती केली. बंगालमध्ये एका मेळाव्याला बंगाली भाषेत संबोधित करताना ते म्हणाले की, मी मिमिक्री करत राहणार, ही एक कला आहे. आवश्यक असल्यास, हे मी हजार वेळा करेल.

कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'मला माझे मत मांडण्याचा मूलभूत अधिकार आहे. तुम्ही मला मारू शकता, पण मी मागे हटणार नाही, मी लढत राहीन. कुणालाही दुखवण्याचा माझा हेतू नाही, असेही ते म्हणाले. पण, माझा प्रश्न आहे की ते (जगदीप धनखड) खरोखरच राज्यसभेत असे वागतात का? मिमिक्री ही कला आहे आणि पंतप्रधानांनी 2014-2019 दरम्यान लोकसभेतही ती केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com