PM Modi Net Worth: घर नाही, कार नाही... PM मोदींची संपत्ती किती कोटींची?

What Is PM Narendra Modi Net Worth : पंतप्रधान मोदींचा आज वाढदिवस आहे. त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, हे आपण जाणून घेवू या.
PM Narendra Modi Net Worth
PM मोदींची संपत्तीSaam Tv
Published On

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७४वा वाढदिवस साजरा करत आहेत. एक चहा विकणारा मुलगा देशाची कमान सांभाळू शकतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्ध करून दाखवलं आहेत. अनेक संघर्षानंतर नरेंद्र मोदी सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत. प्रथम आरएसएसमध्ये नंतर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आजवर अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

आतातर ते संपूर्ण देशाची जबाबदारी सांभाळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा भार स्विकारला आहे. या टप्प्यावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींकडे नेमकी संपत्ती (PM Narendra Modi Net Worth) किती? हा प्रश्न सर्वांना पडतोय. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिज्ञापत्रात याबाबत संपूर्ण माहिती दिलीय.

PM मोदींची एकूण मालमत्ता किती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शपथपत्रात त्यांची एकूण संपत्ती ३.०२ कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांच्या संपत्तीमध्ये जंगम आणि स्थावर मालमत्ता तसेच गुंतवणुकीचा समावेश होतो. २०१९ आणि २०१४ मधील त्यांच्या घोषणांच्या तुलनेत यंदा पीएम मोदींच्या संपत्तीत वाढ झाली (What Is PM Narendra Modi Net Worth) आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार मोदींना २०१४ मध्ये १.६६ कोटी तर २०१९ मध्ये २.५१ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं घोषित केलं होतं.

मोदींकडे सोनं किती?

पीएम मोदींच्या गुंतवणुकीत २.६७ लाख रुपये किमतीच्या सोन्याचा समावेश आहे. हे सोनं चार अंगठ्याच्या रूपात ठेवलेलं आहे. याशिवाय त्यांनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये ९.१२ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांची ही गुंतवणूक २०१९ मध्ये ७.६१ लाख होती. यंदा २ लाख रूपयांनी वाढल्याचं (PM Modi Birthday) दिसतंय. याव्यतिरिक्त २०१४ च्या प्रतिज्ञापत्रानुसार मोदींकडे बँकेत २.८५ कोटी रुपये मुदत ठेवी आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणतीही जमीन किंवा शेअर्स नाहीत. त्यांची म्युच्युअल फंडात गुंतवणूक नाही. तर मोदींकडे ५२,९२० रुपये रोख रक्कम असल्याचं समजतंय.

शिक्षण काय?

मोदींनी गुजरात विद्यापीठातून एमएची पदवी घेतल्याचं देखील जाहीरपणे सांगितलं होतं. प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, ते १९७८ च्या बॅचचे दिल्ली विद्यापीठातून कला शाखेचे पदवीधर (PM Modi News) आहेत. त्यांनी १९६७ मध्ये गुजरात बोर्डातून एसएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांच्याविरुद्ध कोणतेही फौजदारी खटले प्रलंबित नसल्याची माहिती मिळतेय. तसेच मोदींकडे कोणत्याही प्रकारची सरकारी थकबाकी नसल्याचं समोर आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com