Mock Drill: मॉक ड्रिल म्हणजे नक्की काय? सायरन वाजल्यावर नेमकं काय करावं? जाणून घ्या सविस्तर

What Is Mock Drill India Vs Pakistan War: केंद्र सरकारने उद्या देशभरात मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश दिले आहे. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
Mock Drill
Mock DrillSaam Tv
Published On

बुधवारी संपूर्ण देशात मॉक ड्रिल होणार आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हे मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. जर भविष्यात कधी युद्ध झाले तर कशी काळजी घ्याल याच पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक नागरिकाला सावध बनवण्यासाठी मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहेत.

Mock Drill
India Pakistan Tension: नापाक इराद्यांचे नवे चेहरे, दहशतवादाचे तरुण चेहरे कोण? तरुणांना भडकवणार,दहशतवादी घडवणार?

बुधवारी स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रिलची अंबलबजावणी केली आहे. १९७१ च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल करण्यात आले होते. दरम्यान, आता खरंच भारत पाकिस्तान युद्ध होणार का असे प्रश्न विचारले जात आहे.

याबाबत भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले लष्करी अधिकारी ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी माहिती दिली आहे. गृहमंत्रालयाने मॉकड्रीलचे आदेश दिले आहे. ज्याचं उद्देश ब्लॅक आउट करने म्हणजे एखाद्या जागी विमानाचा,शेपणाचा,तसेच ड्रोनचा हल्ला झाला तर त्या भागातील जनतेला रक्षण करणे हा भाग असतो.कारण एअर डिफेन्स जे असतं ते फक्त मिलिटरी टार्गेटच्या जवळपास असतो.

Mock Drill
India vs Pakistan: भारताचा 'वॉटर स्ट्राइक' चिनाब कोरडी; पाकिस्तानच्या घशाला कोरड

सायरन वाजल्यावर काय करावे?

  • ज्या वेळेस सायरन वाजतो तेव्हा सगळ्यात पहिले लाईट बंद व्हायला पाहिजे.कारण जर लाईट बंद नसेल तर शत्रूच्या विमानांना आपल्या शहरातील टार्गेट बघायला मदत होईल.

  • दुसरा सायरन वाजला की लोकांनी आपल्या बिल्डिंग मधून खाली यायला हवं कारण जरी हवाई हल्ला झालं तरी नुकसान होणार नाही.

  • इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस देखील बंद करावे लागतात.

  • आग लागणाऱ्या गोष्टींवर देखील लक्ष ठेवावे लागतात. बाहेर पडण्यासाठी कोणते मार्ग आहे हे देखील पहावं लागतं.

  • जखमी लोकांना कसं रुग्णालयात पोहोचावं लागतं हे देखील पहावं लागतं.आणि या सगळ्यांची प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे यामुळे लोक घाबरून जाणार नाही.

१९७१ च्या लढाई मध्ये अँटी एअरक्राफ्टने हल्ला केला आणि काही लोक हे बाहेर पडले आणि ते गोळा करायला लागले या नादात त्यांचा जळून मृत्यू झाला होता. त्यामुळे हवाई हल्ल्याच्यावेळी असे कोणतेही धाडस करु नका असा सल्ला दिलाय.

Mock Drill
Pahalgam Attack : दहशतवाद्यांना मदत करणारा ठार, पोलिसांना गुंगारा देऊन नदीत उडी, पण शेवटी... VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com