Gujarat HC: 'मंदिरांतील आरतीचं काय?'; गुजरात HCने मशिदींवरील लाऊडस्पीकर बंदीच्या मागणीची याचिका फेटाळली

Gujarat High Court: मशिदींवर वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचं या याचिकेत सांगण्यात आलं होतं. ही याचिका शक्तीसिंग जाला यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. गुजरात न्यायालायने ही याचिका फेटाळून लावलीय.
Gujarat High Court
Gujarat High Courtyandex
Published On

Gujarat High Court Reject PIL On Loudspeakers In Mosques:

गुजरात उच्च न्यायालयाने मशिदींवरील लाऊडस्पीकरबाबत महत्त्वाचा निर्णय दिलाय. गुजरात न्यायालायने अजानसाठी मशिदींवर वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची याचिका फेटाळून लावलीय. मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध पी. मायी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिलाय. खंडपीठाने आपला निर्णय देताना ही याचिका म्हणजे ‘संपूर्ण गैरसमज’ असल्याचं नमूद केलंय. (Latest News)

मशिदींवर वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचं या याचिकेत सांगण्यात आलं होतं. ही याचिका शक्तीसिंग जाला यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. शक्तीसिंग जाला हे बजरंग दलाचे नेते आहेत. मशिदींवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदूषण होतं. लाऊडस्पीकरमुळे सामान्य लोकांच्या आरोग्यावर, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. तसेच इतर गैरसोयींना कारणीभूत ठरत असल्याचं कारण या याचिकेत देण्यात आलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याचिकाकर्त्याच्या दाव्यामध्ये वैज्ञानिक आणि प्रायोगिक पुराव्यांचा अभाव असल्याचं खंडपीठाच्या लक्षात आलं. आपला निर्णय देताना खंडपीठाने म्हटलं की, अजानचा आवाज साधारण १० मिनिटे चालत असतो. यामुळे मर्यादित डेसीबलची पातळी ओलांडत नसल्यामुळे ध्वनी प्रदूषण होत नाही.

लाऊडस्पीकरद्वारे कोणी व्यक्ती अजान करत असेल तर तो मर्यादित डेसीबल ओलांडत नाही, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत नसल्याचं खंडपीठाने म्हटलं. त्याचवेळी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला मंदिरातील आरत्या,घंटानाद विषयी विचारणा केली. मंदिरातसुद्धा पहाटे तीन वाजता आरती होते, त्यावेळी घंटानाद केला जातो. यामुळे ध्वनी प्रदूषण होत नाही का? मंदिरात होणारा घंटानाद हा मंदिराच्या बाहेर जात नाही का, असा प्रश्न खंडपीठाने याचिकाकर्त्याला केला.

Gujarat High Court
लाऊडस्पीकर आरती लावण्याने तुंबळ हाणामारी; तरुणाची हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com