IPS Transfer: २८ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्यातील पोलीस विभागात मोठा फेरबदल

IPS Transfer: पश्चिम बंगाल सरकारने पोलीस विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल केलाय. सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक (ADG) सुप्रतिम सरकार यांच्यासह २८ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
IPS Transfer:
MAJOR IPS RESHUFFLE IN WEST BENGAL: 28 OFFICERS TRANSFERRED, NR BABU APPOINTED NEW CID CHIEFsaam tv
Published On
Summary
  • पश्चिम बंगाल सरकारने पोलीस विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल केला.

  • एकूण 28 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.

  • या निर्णयामुळे राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे बदल होणार आहेत.

पश्चिम बंगाल सरकारने मंगळवारी पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ स्तरावर मोठा प्रशासकीय फेरबदल केलाय. राज्यातील पोलीस दलातील २८ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आणि ५ पश्चिम बंगाल पोलीस सेवा (WBPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्याच्या गृह विभागाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार हा फेरबदल करण्यात आलाय.

IPS Transfer:
IPS Officers Resign: १४ महिन्यात ७ IPS अधिकाऱ्यांचा राजीनामा; प्रशासनात खळबळ, पोलीस दलातील नोकरी का सोडताय अधिकारी?

यामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) अतिरिक्त महासंचालक (ADG) सुप्रतिम सरकार यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची खाती बदलण्यात आली आहेत. सरकारी अधिसूचनेनुसार, सीआयडीचे एडीजी सुप्रतिम सरकार यांची बदली करून त्यांची एडीजी (टेलिकॉम) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. याआधी 'करेक्शनल सर्व्हिसेस'चे महासंचालक असलेले एन. आर. बाबू यांची सीआयडीचे नवीन महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक (डीजी आणि आयजीपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IPS Transfer:
IPS Transfer: 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणत्या आयपीएस अधिकाऱ्याची कुठे झाली बदली? जाणून घ्या

दरम्यान निवडणूक आयोगाने सुप्रतिम सरकार यांना पोलीस आयुक्तपदावरून हटवले होतं. एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांदरम्यान निवडणूक आयोगाने सुप्रतिम सरकार यांची कोलकाता पोलीस आयुक्त (CP) पदावरून बदली केली होती. बिधाननगर आणि उत्तर बंगालमध्ये नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती एका प्रशासकीय आदेशाद्वारे बिधाननगर पोलीस आयुक्तालय आणि उत्तर बंगालच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.

त्रिपुरारी अथर्व यांच्या जागी अमित कुमार राठोड यांच्याकडे बिधाननगर पोलीस आयुक्तालयाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. उत्तर बंगालचे अतिरिक्त महासंचालक (ADG) जयरामन यांची आर्थिक गुन्हे संचालनालयाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com