आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील जागावाटपावरून पक्षाच्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण होताना दिसत आहे. अलीकडेच पश्चिम बंगालमधील काँग्रेस नेते कौस्तव बागची यांनी बुधवारी टीएमसी सोबतच्या युतीला विरोध करत पक्षाचा राजीनामा दिला.
संदेशखळीचा संदर्भ देत बागची यांनी काँग्रेस नेतृत्वावरही आरोप केले आहेत. ते म्हणाले की, संदेशखाली येथे स्थानिक टीएमसी नेत्यांवर शेतजमीन बळकावल्याचा आणि गावातील महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र मौन बाळगून आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आपल्या राजीनामापत्रात बागची म्हणाले आहे की, "अलीकडच्या राजकीय निर्णयांमुळे पक्ष आत्मघाती मार्गावर आल्याचे दिसते. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे काँग्रेस पक्षाचे लक्ष निवडणुका जिंकण्यावर नाही, तर ते जिंकण्यावर आहे. विशिष्ट व्यक्तीची प्रतिमा ब्रँडिंगवर आहे." बागची यांनी हे पत्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी आणि बंगालचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रभारी गुलाम अहमद मीर यांनाही पाठवले आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, बागची गेल्या वर्षभरापासून टीएमसीसोबतच्या युतीला विरोध करत होते. सप्टेंबरमध्ये बागची यांनी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना एक ई-मेल लिहिला होता, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, काँग्रेसने बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवावी. कारण त्यांचे कार्यकर्ते ज्या पक्षाविरुद्ध लढत आहेत, त्यांच्याशी युती कधीही स्वीकारणार नाही.
गेल्या वर्षी मार्चमध्ये जामिनावर सुटल्यानंतर कौस्तव बागची यांनी टीएमसीच्या निषेधार्थ आपले मुंडन केले होते. राज्यात ममता बॅनर्जी यांचे सरकार असेपर्यंत डोक्यावर केस वाढू देणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी कौस्तव बागची भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.