Weather Update : हवामानात मोठा बदल, ऐन हिवाळ्यात ७ दिवस पडणार धो-धो पाऊस, IMD ने काय इशारा दिला?

Weather Update News : हवामानात लवकरच मोठा बदल होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. हिवाळा संपून उन्हाळा सुरु होण्यापूर्वी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे IMD ने म्हटले आहे.
Weather Update
Weather UpdateSaam Tv
Published On

IMD Weather Update : हिवाळा संपून लवकरच उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. येत्या काही दिवसात हवामान पुन्हा एकदा बिघडणार असल्याचे म्हटले जात आहे. उन्हाळा सुरु पूर्वी पावसाची स्थिती निर्माण होणार आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. परिणामी वातावरण बदलणार आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य दिशेला असणाऱ्या राज्यांमध्ये पर्जन्यवृष्टी होणार आहे. नागालँड आणि आसपासच्या भागात १.५ किमी उंचीवर चक्री वाऱ्यांचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे १५ ते २१ फेब्रुवारी दरम्यान ईशान्य भारतातील अनेक भागांमध्य मुसळधार पावसासह बर्फवृष्टी होऊ शकते. १९ फेब्रुवारी रोजी आसाम, मेघालय या राज्यात पावसाची स्थिती असेल. तर अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांमध्ये मध्यम प्रमाणात पाऊस पडेल.

फेब्रुवारीत दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि बिहार यांसह उत्तर भारतीय राज्यांमध्ये कडक ऊन असणार आहे. याउलट ईशान्येला पाऊस असेल. काही ठिकाणी बर्फवृष्टी देखील होईल. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये १९ आणि २० फेब्रुवारी रोजी हलक्या प्रमाणात पाऊस पडेल आणि थोडीफार हिमवृष्टी होईल.

Weather Update
Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका वाढला; अंगाची अक्षरश: लाहीलाही, सर्वाधिक तापमान कुठे?

राजस्थानमध्ये १७ ते १९ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या दरम्यान पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये १९-२० फेब्रुवारी या दोन दिवसात पाऊस पडणार आहे. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये हवामान शुष्क आहे. तर महाराष्ट्रात पुढील काही दिवसात हवामानात वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

Weather Update
Viral : रणरागिणी! पोटचा गोळा पोटाशी बांधला, भर गदारोळात रेल्वे स्टेशनवर उतरली महिला कॉन्स्टेबल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com