VIRAL VIDEO : जीममध्ये वर्कआऊट करताना डॉक्टरला हार्टअटॅक; नेमकं त्यावेळी काय घडलं?

वर्कआउट करताना डॉक्टर खाली कोसळला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Viral Video News
Viral Video News Saam Tv
Published On

Uttar Pradesh Viral News : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. जीममध्ये व्यायाम करताना डॉक्टरची प्रकृती अचानक बिघडली. वर्कआउट करताना डॉक्टर खाली कोसळला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

Viral Video News
Viral Video: मुलीने केला असा व्यायाम की जिम ट्रेनर हादरला; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

जीममध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दुर्दैवी घटना कैद झाली आहे. लखनऊच्या विकास नगर परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ४१ वर्षीय डॉक्टर संजीव पाल हे जीममध्ये व्यायाम करत होते.

व्यायाम करताना डॉ. पाल यांची प्रकृती बिघडली. ते अचानक खाली कोसळले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संजीव पाल हे बाराबंकीच्या रुग्णालयात कार्यरत होते. विकासनगरमध्ये ते आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते.

नेहमीप्रमाणे ते जीममध्ये वर्कआऊट करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला ते बेशुद्ध झाल्याचे जीममध्ये असलेल्या इतर व्यक्तींना वाटले. पण त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

विकास नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्याने डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही सांगण्यात आले.

Viral Video News
Viral Video : मेडिकलमध्ये ORS घ्यायला गेला अन्..., हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल

हॉटेल चालकाचा जीममध्ये मृत्यू

दरम्यान, याआधीही इंदूरमध्ये अशीच एक घटना घडली होती. जीममध्ये व्यायाम करताना हॉटेल चालकाला चक्कर आली होती. खाली कोसळल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com