Pollution: राजधानी दिल्लीत लॉकडाऊन लागण्याचा इशारा: सर्वोच्च न्यायालयाची सूचना

दिल्ली- एनसीआरमध्ये हवा दूषित झाली आहे. वाढत्या वायू प्रदूषणाने, AQI ची पातळी नेहमी ५०० च्यावर आहे
Pollution: राजधानी दिल्लीत लॉकडाऊन लागण्याचा इशारा: सर्वोच्च न्यायालयाची सूचना
Pollution: राजधानी दिल्लीत लॉकडाऊन लागण्याचा इशारा: सर्वोच्च न्यायालयाची सूचनाSaam Tv

दिल्ली : दिल्ली- एनसीआरमध्ये हवा दूषित झाली आहे. वाढत्या वायू प्रदूषणाने, AQI ची पातळी नेहमी ५०० च्यावर आहे. ज्यामुळे लोकांना श्वास घेण्याकरिता त्रास होत आहे. शनिवारी यामुद्द्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लवकरात लवकर कारवाई करण्यास सांगितले आहे.

सरन्यायाधीश एनव्ही रामण्णा दिलेल्या माहितीनुसार की, अशा परिस्थितीमध्ये घरातही मास्क लावून बसावे लागणार आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला हवेच्या प्रदूषणाचा सामना करण्याकरिता मार्ग काढण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या टीकेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वायू प्रदूषणावर कारवाई करण्याकरिता आज तातडीची बैठक बोलावली आहे.

हे देखील पहा-

ज्यामध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ शकणार आहे. आजच्या आपत्कालीन बैठकीत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, पर्यावरण मंत्री गोपाल राय आणि दिल्लीचे मुख्य सचिव उपस्थित राहणार आहेत. सकाळी सर्वोच्च न्यायालयात जेव्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. त्यावेळेस सरन्यायाधीश रामण्णा यांनी थेट सरकारलाच प्रश्न केला आहे की तुम्ही बघाच परिस्थिती किती धोकादायक आहे.

Pollution: राजधानी दिल्लीत लॉकडाऊन लागण्याचा इशारा: सर्वोच्च न्यायालयाची सूचना
अमरावतीत 144 कलम लागू: पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन

तसेच मास्क लावून, घरी बसावे लागणार आहे. काय पावले उचली जात आहेत? दिल्ली एनसीआर मधील वायू प्रदूषणाची चिंताजनक पातळी गाठल्यावर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सीपीसीबी उपसमितीने शुक्रवारी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन ग्रेप अंतर्गत महत्वाची बैठक घेतली आहे, आणि दिल्ली, हरियाणा सरकारला विचारण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश आणि राजस्थानला कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. निर्णयांची अंमलबजावणी करण्यास देखील सांगितले आहे. या बैठकीत राज्य सरकारांना सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून वापरले जाणारे वाहनांची संख्या ३० टक्क्यांनी कमी करण्यास सांगण्यात आली आहे, जेणेकरून वाहनांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com