Viral Video: मेट्रोमध्ये अचानक घुसली दुसरी ट्रेन! धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Train Video: सुरुवातीला सर्वकाही सामान्य दिसते. परंतु पुढच्या सेकंदातच दिसणाऱ्या दृष्यामुळे तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
Train Entered In Metro Video Viral
Train Entered In Metro Video ViralSAAM TV

Train Entered In Metro Video Viral : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही गंमतीशीर असतात, काही विचार करायला भाग पाडतात तर काही धडकी भरवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडिओत जे दिसतय त्यावर विश्वास ठेवमे तुम्हाला कठीण जाईल. हा व्हिडिओ एका मेट्रोचा असल्याचे दिसत आहे. यामध्ये प्रवासी आरामात प्रवास करत आहेत. सुरुवातीला सर्वकाही सामान्य दिसते. परंतु पुढच्या सेकंदातच दिसणाऱ्या दृष्यामुळे तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला असून त्याला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

Train Entered In Metro Video Viral
Farmers Long March: लाल वादळ शमलं! सरकारच्या आश्वसनानंतर शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्च स्थगित

मेट्रोत घुसली दुसरी ट्रेन

सुरुवातीच्या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये ट्रेन पूर्णपणे रिकामी असल्याचे दिसून येते. परंतु आत काही प्रवासी बसले असून त्यातील एकाने त्याच्या मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आहे असे दिसते. पॅसेंजर ट्रेनमध्ये व्हिडिओ शूट करत असताना अचानक दुसरी ट्रेन बुलेटच्या वेगाने मेट्रोत घुसते. फ्रेममधलं हे दृश्य कुणालाही हादरवायला पुरेसं आहे. (Viral Video)

Train Entered In Metro Video Viral
Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ, जाणून घ्या आजचे दर

व्हिडिओवर अनेक भन्नाट प्रतिक्रिया

मेट्रोमध्ये धावणाऱ्या ट्रेनचा हा व्हिडिओ खरा असे असे भासते मात्र थोडा वेळ लक्ष देऊन पाहिले तर प्रत्यक्षात हा व्हिडीओ एडिट करण्यात आला असल्याचे लक्षात येते. अतिशय कल्पक पद्धतीने हा व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लोक भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एडिट करणाऱ्याच्या कल्पणाशक्तीचं यूजर्स कौतुक करत आहेत. आर्टिस्ट नावाच्या हँडलने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (Latest Marthi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com