Viral Dance Video: जबरदस्त अन् नाद खुळा! या तरुणीचा डान्स पाहाल तर् गौतमीलाही विसराल...

सोशल मीडियावर तुफान चर्चेत असलेल्या या तरुणीच्या मनमोहक अदा अन् बॉलिवूड अभिनेत्रीलाही लाजवतील अशा डान्स मूव्ह्ज पाहून तुम्हीही तिचे फॅन झाल्याशिवाय राहणार नाही...
Pakistani Girl Viral Dance Video
Pakistani Girl Viral Dance VideoSaamtv
Published On

Viral Dance Video: सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमधून असे काही प्रकार पाहायला मिळतात जे पाहून कधी भितीने गाळण उडते. तर कधी आश्चर्याचा धक्काही बसतो. सध्या असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हायरल होणारा व्हिडिओ एका मुलीच्या डान्सचा आहे. व्हिडिओमधील मुलीचा सुंदर अन् ठेकेबाज डान्स पाहून समोरचा अगदी हरवून जाताना दिसत आहे. जाणून घेवूया या व्हिडिओची सविस्तर कथा.. (Viral Video)

Pakistani Girl Viral Dance Video
Ind Vs NZ ODI Serirs: धावांचा पाऊस, जबरदस्त फॉर्म; तरीही 'या' गोलंदाजाने फोडलाय विराटला घाम

सध्याचे युग हे इंटरनेटचे युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यामुळे अनेकजण रातोरात स्टारही झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका पाकिस्तानी मुलीचा डान्स करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ही तरुणी मेरा दिल ये पुकारे आजा या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत होती..

आता पुन्हा एकदा सुंदर पाकिस्तानी तरुणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमधील तरुणी संजय लिला भन्साळीच्या राम लिला चित्रपटातील अंग लगा दे रे गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. (Pakistani Girl Dance)

Pakistani Girl Viral Dance Video
Kalyan News: कपडे व्यापाराच्या नावाखाली खाली बनावट दारूची तस्करी; १६ लाखांच्या बनावट दारू जप्‍त

समोर आलेल्या माहितीनुसार, ही तरुणी तिच्या बहिणीच्या लग्नातील कार्यक्रमात हा डान्स करत आहे. व्हिडिओमधील तरुणीने चॉकलेटी रंगाचा सुंदर लेहंगा घातला आहे. गाण्यातील प्रत्येक ओळीनुसार ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिच्या प्रत्येक डान्स मूव्ह्ज आणि स्टेप्स एखाद्या बॉलिवूडच्या अभिनेत्रीलाही लाजवतील अशा आहेत.

हा व्हिडिओ नतालिया कॉलिंग (Instagram) नावाच्या अकाउंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ शेअर करत नतालियाने "इंस्टाग्राम मला सगळ्याच गोष्टी अपलोड करण्याची परवानगी देत नाही, पण या हुशार बहिणीचा व्हिडिओ मी शेअर करत आहे, जिचा मला खूप अभिमान आहे," असा कॅप्शन दिला आहे.

सोशल मीडियावर या मुलीच्या डान्सने नेटकऱ्यांना अक्षरशः वेड लावले आहे. व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे तर काही जणांनी तिच्या अप्रतिम डान्सचे गोडवे गायले आहेत. मुलीच्या या जबरदस्त डान्सचे नेटकऱ्यांनी जोरदार कौतुक केले असून आत्तापर्यंत हा व्हिडिओ तब्बल २ लाख लोकांनी पाहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com