Viral News: नशीब असाव तर असं! उसने ४० रुपये घेतले; रोजंदारी करणारा मजूर काही तासात करोडपती

West Bengal Viral News: एक रोजदांरीने काम करणारा मजुर अवघ्या काही तासात करोडपती झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
West Bengal Viral News
West Bengal Viral NewsSaamtv

West Bangal Viral News:

कोणाचे नशीब कधी अन् कसे बदलेल काही सांगता येत नाही. एखादी गरीब व्यक्ती रातोरात करोडपती झाल्याची असंख्य प्रकरणे तुम्ही ऐकली असतील. पश्चिम बंगालमधून अशीच एक आश्चर्यकारक आणि चकित करणारी घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवानमधील एक रोजदांरीने काम करणारा मजुर अवघ्या काही तासात करोडपती झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

West Bengal Viral News
Marathi Sahitya Sammelan: जळगावात होणार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बोधचिन्हाचं झालं अनावरण

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पश्चिम बंगालच्या खुर्तुबापूर गावात भास्कर माळी नावाचे गृहस्थ राहतात. भास्कर माळी हे रोजंदारीने काम आणि शेळ्या चारुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. भास्कर माळी यांना लॉटरी लावण्याचा छंद होता त्यामुळे गेल्या १० वर्षांपासून ते लॉटरी लावून आपले नशीब आजमावत होते.

कधीतरी नशीब उजळेल अन् आपणही करोडपती होऊ याच आशेने त्यांनी रविवार (१ ऑक्टोंबर) उसने ४० रुपये घेवून लॉटरीचे तिकीट घेतले होते. याच तिकीटाने त्यांचे नशीब पालटले असून त्यांना करोडोंची लॉटरी लागली.

याबाबत भास्कर माळी यांनी सांगितले की, ते नापारा बसस्थानकावर गवत कापण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याकडे लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी त्यांनी एका व्यक्तीकडून उसने पैसे घेवून लॉटरीचे तिकीट खरेदी केले. तिकीट खरेदी करुन ते गवत कापण्यासाठी गेले. माघारी आल्यानंतर त्यांना आपल्याला लॉटरी लागल्याचे समजले. (Latest Marathi News)

West Bengal Viral News
Kalyan Latest News: मराठी तरूणाला परप्रांतीय फेरीवाल्यांकडून मारहाण; मनसे कार्यकर्त्यांनी चोपून काढले

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com