Vinesh Phogat : कुस्तीचा आखाडा, ऑलिम्पिक ते निवडणूक; विनेश फोगाटच्या आयुष्यात ८ तारखेचा मोठा योग

Haryana Election result : विनेश फोगाटने हरियाणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. पॅरिसपासून जुलानापर्यंत विनेशच्या आयुष्यात 8 तारखेचा मोठा योग पहायला मिळत आहे.
Vinesh Phogat
Vinesh Phogat Saam Digital
Published On

भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने करिअरमध्ये अशा काही कामगिरी साधल्या आहेत ज्यामुळे अनेक आव्हाने तिच्यासमोर फिकी ठरली आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक अशा गंभीर समस्यांचा सामना करवा लागला आहे. ज्यामुळे विनेश फोगाट आणखी कणखर बनली आहे. विनेशसमोर सर्वात मोठ्या तीन आव्हानांपैकी पहिलं म्हणजे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात केलेलं आंदोलन आहे. या काळात विनेश, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर कारवाईसाठी सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणला होता .

विनेशसमोर दुसरं मोठं आव्हान 2024 चं पॅरिस ऑलिम्पिक होतं. सेमीफायनल उत्कृष्ट प्रदर्शन करत सिल्वर मेडल पक्क केलं होतं. मात्र, एका नियमामुळे तिचे हे मेडल हिरावलं गेलं. इथेही तिने शरीर आणि ऑलिम्पिक नियमांशी कडवी झुंज दिली. कदाचित गोल्ड मेडलही ती खेचून आणू शकली असती, मात्र ऑलिम्पिक नियमांसमोर तिला हार पत्करावी लागली. यासाठी विनेशने पुन्हा लढाई लढली. परंतु येथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

तिसरे मोठे आव्हान हरियाणा विधानसभा निवडणूक होतं. मात्र विनेशने इथे धडाकेबाज विजय मिळवला आहे. आता त्या पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचणार आहेत.पॅरिसमध्ये विनेशला वेट मशीनने हरवलं होतं, मात्र हरियाणा निवडणुकीत विनेशला वोटिंग मशीनने विजय मिळवून दिला. या सर्व घटनांमध्ये पॅरिसपासून जुलाना विधानसभा मतदारसंघापर्यंत, 8 तारखेचा विनेशच्या जीवनात मोठा योग पहायला मिळतो.

100 ग्रॅम जास्त वजनाने गोल्ड हिरावलं

50 किलो वजनी गटातून विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. 6 ऑगस्टला सलग तीन लढती जिंकून फाइनलमध्ये प्रवेश केला होता. विनेशने याच दिवशी सेमीफायनल जिंकली होती. फाइनलमध्ये स्थान मिळवल्यानंतर विनेशने सिल्वर मेडल पक्क केलं होतं. पराभव झाला असता तरी रजत पदक मिळालं असतं. हा फाइनल सामना भारतीय वेळेनुसार 7 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:30 नंतर म्हणजेच 8 ऑगस्टला होणार होता.

Vinesh Phogat
Mehraj Malik : आपची ५ राज्यांमध्ये एन्ट्री, जम्मू काश्मीरमध्ये विजय मिळवणारे आपचे मेहराज मलिक नक्की कोण आहेत? वाचा सविस्तर

मात्र, 7 ऑगस्टच्या सकाळी वजन चाचणीमध्ये विनेशचं वजन 50 किलो वजनी गटासाठी 100 ग्रॅम जास्त भरलं होतं. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि ती स्पर्धेतून बाहेर फेकली गेली. त्यामुळे सिल्वर मेडलही हिरावलं गेलं. सेमीफायनलमध्ये ज्यांना तिने हरवलं होतं, त्यांना फाइनलमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

विनेश फोगाटने आपल्याला अपात्र ठरवल्याच्या निर्णयाविरोधात आर्बिट्रेशन स्पोर्ट कोर्ट (CAS) मध्ये अपील केली आणि संयुक्तरित्या सिल्वर मेडल देण्याची मागणी केली. मात्र CAS ने नियमांचा हवाला देत विनंती फेटाळून लावली. त्यामुळे विनेशचं ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं.

राजकारणात पाऊल ठेवलं अन्

कुस्तीच्या मैदानात आपली ताकद दाखवणाऱ्या विनेश फोगाटने ऑलिम्पिकनंतर राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेतला. मात्र तिचे काका आणि कुस्तीचे गुरू महावीर सिंह फोगाट यांना विनेशचा हा निर्णय आवडला नाही.

या सर्वांनंतरही विनेशने राजकारणात पाऊल ठेवलं आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली. त्यांच्यासमोर WWE रेसलर कविता रानी (कविता दलाल) 'आप'च्या तिकीटावर निवडणूक लढवत होत्या. तिचं डिपॉझिट जप्त झालं आहे. विनेशने विजय मिळवला, मात्र काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूरच राहिला.

विनेशला 65,080 मतं मिळाली. तिने भाजपचे उमेदवार योगेश कुमार यांचा 6,015 मतांनी पराभव केला. हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर झाले, तर पॅरिस ऑलिम्पिकमधील विनेशचा फाइनल सामना तांत्रिकदृष्ट्या 8 ऑगस्टला होणार होता. त्यामुळे ही तारीख विनेशच्या आयुष्यात एक महत्त्वाचा योग ठरली आहे.

Vinesh Phogat
Mehraj Malik : आपची ५ राज्यांमध्ये एन्ट्री, जम्मू काश्मीरमध्ये विजय मिळवणारे आपचे मेहराज मलिक नक्की कोण आहेत? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com