Veerangana on Wheels; महिला गुन्हेगारीविरोधात शिमला पोलीस सज्ज

हिमाचल प्रदेश आणि सिमला पोलिस महिलांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहेत.
Veerangana on Wheels; महिला गुन्हेगारीविरोधात शिमला पोलीस सज्ज
Veerangana on Wheels; महिला गुन्हेगारीविरोधात शिमला पोलीस सज्जTwitter/@ANI
Published On

शिमला: शहरातील महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीला (Crime against women० रोखण्यासाठी शिमला पोलिसांनी (Shimla Police) शनिवारी "वीरांगना ऑन व्हील्स" (Veerangana on Wheels) हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांर्तगत शिमल्यातील महिला पोलीस दुचाकीवरुन गस्त घालणार आहेत. शिमलाचे महापौर सत्य कौंडल (Satya Kaundal, Mayor) यांनी "वीरांगना ऑन व्हील्स" उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवत उपक्रमाची सुरुवात केली. (Veerangana on Wheels; Shimla Police ready against crime against women)

हे देखील पहा-

शिमलाचे पोलिस अधीक्षक (SP) मोहित चावला (Mohit Chawala) यांनी याबाबत माहिती दिली. "वीरांगना ऑन व्हील्स" हा उपक्रम हिमाचल प्रदेश पोलिसांनी स्थापित केलेल्या हेल्प डेस्कचा एक भाग आहे. हिमाचल प्रदेश आणि शिमला पोलिस महिलांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहेत. सहा महिन्यांपूर्वी, शिमला शहर वाहतूक नियमन आणि व्यवस्थापन योजनेसाठी शिमला पोलिसांनी शहरातील 'राफ्टार पथक' सुरू केले होते. यातही 24x7 पोलिस तैनात करण्यात आले होते.

"या उपक्रमाला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता हे लक्षात घेऊन आम्ही यात महिला कॉन्स्टेबलचाही समावेश केला आहे. शिमला जिल्ह्यासाठी अशा 20 बाईक देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये एक तैनात करण्यात येणार आहे. ते वाहनांच्या वाहतुकीचे नियमन देखील करतील, असेही यावेळी चावला सांगितले आहे. या स्कुटर जीपीएस सिस्टमसह बॉडी व्हॅन कॅमेर्‍याने सुसज्ज असतील. स्कूटीमधील वॉकी-टॉकी सेट कंट्रोल रूमशी जोडलेला आहे. या स्कूटरमध्ये ब्लू आणि रेड लाइट सायरन बसविण्यात आले आहेत. त्यामुळे कोठूनही महिलांशी संबंधित तक्रारी आल्यानंतर महिला पोलिस कर्मचारी थेट घटनास्थळी पोहोचतील आणि कारवाई करतील.

Veerangana on Wheels; महिला गुन्हेगारीविरोधात शिमला पोलीस सज्ज
28 वर्षांनंतर भारत- पाकिस्तान सीमेवरील शेतकऱ्यांना करता येणार शेती

याशिवाय महाविद्यालये, शाळा, बसस्थानकांसह अन्य गर्दी असलेल्या ठिकाणी, मुली व विद्यार्थिनींची छेडछाड होऊ नये यासाठी स्कूटरवरील महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे लक्ष असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील स्पीड पथक कर्मचारीही मोटारसायकलींवरुन वाहतुकीवर नियंत्रण करत आहेत. आतावीरांगना ऑन व्हील्सच्या पोलिस महिला शहरातील गर्दीच्या ठिकाणी स्कूटीवरुन लक्ष ठेवतील.

वीरांगना ऑन व्हील्स उपक्रमाबाबत शिमल्याच्या महापौरांनी देखील आपली भुमिका स्पष्ट केली आहे. "महिलांविरूद्धचे गुन्हे वाढत आहेत. पोलिसांनी हा उपक्रम सुरू केल्याचा मला आनंद झाला आहे. आता दुचाकीवरील महिला पोलिस कर्मचारी काही वेळातच शहरातील कोणत्याही रस्त्यावर पोहोचतील. मी शिमला पोलिसांचे यासाठी आभार मानतो."

Veerangana on Wheels; महिला गुन्हेगारीविरोधात शिमला पोलीस सज्ज
CBSE विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क परत करण्यासाठी न्यायालयात याचिका

दरम्यान, महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्रातही दिशा कायदा लागू करण्यात येणार होता. मागील दोन वर्षांपासून या कायद्याबाबत चर्चा सुरु होती. त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात, महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी व राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दिशा’ कायदा विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनात संमत करून घेण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मात्र आता राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडी पाहता हा कायदा लागू होईल, की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com