नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (CBSE) दहावी व बारावीच्या (X and XII) विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क (Examination fee) परत देण्याबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका (Writ petition) दाखल करण्यात आली आहे. कोरोना साथीच्या काळात सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता जर परिक्षाच रद्द झाली असेल तर विद्यार्थ्यांकडून घेतलेले परिक्षा शुल्कही सीबीएसईने परत द्यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. (Petition in court for refund of examination fees of CBSE students)
हे देखील पहा-
सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील दीपा जोसेफ यांनी फी परत करण्याची मागणी केली आहे. अखिल भारतीय पालक असोसिएशनने परीक्षा शुल्क परत करण्याची मागणीही नुकतीच केली होती. यावर्षी त्यांनी त्यांच्या मुलांसाठी सीबीएसईला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेस बसण्यासाठी अर्ज केला होता. 7 विषयांच्या परीक्षेसाठी 2100 रुपये सीबीएसईकडे परिक्षा शुल्क जमा केले होते. परंतु 14 एप्रिल रोजी सीबीएसईने कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभुमीवर परीक्षा रद्द केली. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे निकालही अद्याप जाहिर झालेले नाहीत.
सीबीएसईने लाखो विद्यार्थ्यांकडून परीक्षा घेण्यासाठी फी म्हणून पैसे घेतले आहेत. या परिक्षा शुल्कात परीक्षा शुल्क, प्रत, परीक्षक, इनविजिलेटर आणि इतर खर्चाचा समावेश आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत जर परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, त्यामुळे सीबीएससीला काहीच खर्च झालेला नाही. त्यामुळे सीबीएससीने विद्यार्थ्यांकडून घेतलेले परिक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेत सीबीएसई व्यतिरिक्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयालाही पक्ष म्हणून करण्यात आले आहे. याशिवाय, सीबीएसई आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला याबाबत एक नवीन परीक्षा परतावा धोरण तयार करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सोमवारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.