Vande Bharat train Video: वंदे भारत ट्रेनच्या पायलटने दाबला इमर्जन्सी ब्रेक, अन् मोठा अनर्थ टळला

Vande Bharat Train Makes Emergency Stop: ट्रॅकवर गडबड असल्याचा संशय आल्याने ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली त्यामुळे मोठा अनर्थ टळला...
Vande Bharat train Video
Vande Bharat train VideoSaamtv

Vande Bharat Train Viral Video:

राजस्थानमध्ये वंदे भारत ट्रेनला घातपात करण्याचा कट केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून रुळावर दगड आणि लोखंडी वस्तू ठेवल्याचे दिसत आहे. सुदैवाने लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या सविस्तर...

Vande Bharat train Video
Surat News: चमत्कार! गणपती बाप्पानं वाचवला १३ वर्षीय मुलाचा जीव; समुद्रात वाहून गेलेला मुलगा 24 तासांनंतर जिवंत सापडला

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवार (२ ऑक्टोंबर) उदयपूर-जयपूर (Udaipur-Jaipur) वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा अपघात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही अज्ञातांनी रेल्वे रुळावर ट्रेन खाली उतरण्यासाठी दगडं आणि लोखंडाच्या वस्तू ठेवल्या. भिलवाड स्थानकापुर्वी येणाऱ्या असलेल्या सोनियाना आणि गंगरार रेल्वे स्थानकादरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला.

सुदैवाने हा संपूर्ण प्रकार लोकोपायलटच्या लक्षात आला. सोनियाना आणि गंगरार रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅकवर गडबड असल्याचा संशय आल्याने ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली तसेच रुळावरील दगडे आणि लोखंडी वस्तू बाजुला काढण्यात आल्या. हे अडथळे काढल्यानंतर ट्रेन पुढील मार्गी रवाना झाली.

भारतीय रेल्वेकडून या घटनेबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. परंतु उत्तर पश्चिम रेल्वे पोलीस प्रशासनाने याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे. याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com