Surat News: चमत्कार! गणपती बाप्पानं वाचवला १३ वर्षीय मुलाचा जीव; समुद्रात वाहून गेलेला मुलगा 24 तासांनंतर जिवंत सापडला

Ganeshotsav 2023: गणपती विसर्जनावेळी बुडालेला मुलगा तब्बल २४ तासानंतर जिवंत सापडला आहे.
Surat News
Surat NewsSaam Tv

Surat Ganeshotsav News :

देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. गणपती विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात धामधूम पाहायला मिळाली. यावेळी अनेक ठिकाणी दुर्घटना समोर आल्या. गणपती विसर्जनावेळी पाण्यात बुडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक दुर्दैवी घटना देखील घडल्या. मात्र एका घटनेत एक १३ वर्षीय मुलगा चमत्कारिकरित्या बचावला आहे. गणपती विसर्जनावेळी बुडालेला मुलगा तब्बल २४ तासानंतर जिवंत सापडला आहे. सुरतमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमध्ये एक १३ वर्षीय मुलगा शनिवारी दुपारी अरबी समुद्रात जिवंत सापडला आहे. दुमास येथे बाप्पाच्या विसर्जनावेळी हा मुलगा भरतीच्या पाण्यात वाहून गेला होता. २४ तासाहून अधिक काळ समुद्रात असलेला मुलगा जिवंत सापडल्याने सगळेच चकीत झाले आहेत. लखन देवीपूजक असे मुलाचे नाव आहे. एका मच्छीमाराला हा मुलगा सापडला आहे.

Surat News
WhatsApp ची भारतात मोठी कारवाई, ऑगस्टमध्ये 74 लाख अकाउंटवर घातली बंदी; नेमकं काय आहे कारण?

रसिक तांडेल हा मच्छीमार समुद्रात गेला त्यावेळी त्याला हा मुलगा दिसला. रसिक मासेमारीसाठी समुद्रात गेला त्यावेळी लखन त्याला एका मोठ्या प्लायवूडवर तरंगताना दिसला. त्याने गणेशमूर्तीचा आधार घेतला होता. मूर्तीचा आधारे तो मुलगा तरंगत होता. बाप्पाच्या मूर्तीमुळे तो बचावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मच्छिमाराला समुद्रात एक तरंगता प्लायवूड लांबून दिसला. त्याला संशय आल्याने त्याने बोट जवळ नेऊन पाहिले, तर एक मुलगा त्याचा आधार घेत तरंगत होता. हे पाहून त्याला धक्काच बसला'.

गणपती विसर्जनावेळी मुलगा आपल्या कुटुंबियासोबत दुमास येथे गेला होता. मुलगा सापडत नसल्याने कुटुंबियानी तो हरवल्याची तक्रार दुमास पोलिसात दाखल केली होती. मात्र आपला मुलगा आता सुखरुप घरी पोहोचल्याने कुटुंबियांना आनंद झाला आहे. बाप्पा मच्छिमार रसिक तांडेलच्या रुपाने आला अन् मुलाला वाचवले अशी चर्चा आता परिसरातील सुरु आहे.

Surat News
PM Modi : जर्मन गायक चेस कैसेंड्रा मई स्पिटमैनने गायलं 'वैष्णव जन तो' गाणं;पंतप्रधानांनी शेअर केला व्हिडिओ

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com