उत्तर प्रदेशातील मथुरा जंक्शन येथे रेल्वेचा एक विचित्र अपघात झाला आहे. शकूरबस्ती-मथुरा ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर प्रवाशांमध्ये धावपळा पाहायला मिळाली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक प्रवासी जखमी झाला.
मंगळवाली शकूरबस्ती रेल्वे स्टेशनवर ट्रेन येऊन थांबली. यानंतर प्रवासी ट्रेनमधून उतरत होते. मात्र अचानक ट्रेन पुन्हा सुरु झाली आणि थेट प्लॅटफॉर्म तोडून वर चढली. रात्रीची वेळ असल्याने प्लॅटफॉर्मजवळ ५ ते ६ जण उभे होते. सुदैवाने त्यांनी ट्रेन येताना पाहिली आणि तेथून पळ काढला. यामुळे मोठा अनर्थ टळला.
ओएचई लाईनचा एक खांब ट्रेनच्या समोर आला. दरम्यान एक 8 वर्षांचा मुलगा रेल्वेखाली आला. सुदैवाने त्याला दुखापत झालेली नाही. मात्र ही घटना नेमकी कशी घडली याचा रेल्वे अधिकारी आणि आरपीएफची टीम शोध घेत आहे. (Latest Marathi News)
या घटनेनंमालवा सुपरफास्ट, अमृतसर-वांद्रे टर्मिनससह अनेक गाड्या दिल्लीच्या दिशेने थांबवण्यात आल्या आहेत. अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. स्टेशन डायरेक्टर एसके श्रीवास्तव, आरपीएफ प्रभारी अवधेश कुमार गोस्वामी आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.