Azam Khan : आजम खान यांच्यासह कुटुंबीयांना मोठा दिलासा; ७ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती, जामीन मंजूर

Azam Khan case : बनावट जन्मदाखला प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं आझम खान आणि कुटुंबीयांना जामीन दिला आहे.
आजम खान यांच्यासह कुटुंबीयांना मोठा दिलासा; ७ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती, जामीन मंजूर
Azam Khan gets bail in Birth Certificate caseSAAM TV

उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आजम खान आणि त्यांच्या कुटुंबीयांना अलाहाबाद हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. मुलाच्या बनावट जन्मदाखला प्रकरणात कोर्टानं आजम यांना सुनावलेल्या सात वर्षांच्या शिक्षेलाही स्थगिती दिली. तसेच आजम खान, पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुला आजम यांना जामीन मंजूर केला आहे.

बनावट जन्मदाखला प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं आजम खान, पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आजम यांना जामीन मंजूर केला आहे. तंजीन फातिमा आणि अब्दुल्ला यांची तुरुंगातून सुटका होईल. मात्र, आजम खान यांना आणखी एका प्रकरणात सात वर्षांची शिक्षा झाल्यानं त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकत नाही, असे सांगण्यात येत आहे.

आजम खान यांच्यासह कुटुंबीयांना मोठा दिलासा; ७ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती, जामीन मंजूर
Haryana Accident : प्रवाशांनी भरलेल्या बसला ट्रकची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू २५ जखमी

या प्रकरणात रामपूरचे भाजप आमदार आकाश सक्सेना यांनी जानेवारी २०१९ मध्ये आजम खान, त्यांची पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तिघांच्या विरोधात रामपूरच्या गंज पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये एफआयआर नोंदवण्यात आला होता.

आमदार आकाश सक्सेना यांच्या तक्रारीनुसार, आजम खान, तंजीन यांनी अब्दुल्ला याचा जन्मदाखला २८ जून २०१२ रोजी रामपूरच्या नगरपालिकेतून तयार करून घेतला होता. तर दुसरा जन्मदाखला २१ जानेवारी २०१५ रोजी लखनऊ नगरपालिकेतून देण्यात आला होता.

आजम खान यांच्यासह कुटुंबीयांना मोठा दिलासा; ७ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती, जामीन मंजूर
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला दिलासा; मतदानाची आकडेवारी ४८ तासात जाहीर करण्याचे आदेश देण्यास नकार

पहिल्या जन्मदाखल्यावर जन्माचं ठिकाण रामपूर नमूद केलं होतं. पण दुसऱ्या दाखल्यात लखनऊच्या हॉस्पिटलमध्ये झाल्याचं नमूद केलं होतं. आजम खान कुटुंबीयांनी जन्मदाखल्याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला असून, दोन वेगळ्या जन्मदाखल्यांद्वारे दोन पासपोर्ट आणि दोन पॅनकार्ड तयार करून दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात रामपूर पोलिसांनी तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात आजम खान, पत्नी आणि मुलगा फेब्रुवारी २०२० रोजी रामपूर कोर्टात हजर झाले. कोर्टानं तिघांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. आजम खान यांना २७ महिन्यांनी जामीन मिळाला.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com