Uttar Pradesh News: वरमाला घालताना नवरदेवाने नवरीला केलं किस, दोन्हीकडच्या वऱ्हाड्यांमध्ये तुंबळ हाणामारी

Clash In Wedding After Groom Kissed Bride: नवरीच्या नातेवाईकांनी फक्त नवरदेवालाच मारहाण केली नाही तर त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या नातेवाईकांनाही चांगला चोप दिला. नवरदेवाच्या नातेवाईकांनी नवरीच्या नातेवाईकांवर दगडफेक केली. यामुळे लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला.
Uttar Pradesh News: वरमाला घालताना नवरदेवाने नवरीला केलं किस, दोन्हीकडच्या वऱ्हाड्यांमध्ये तुंबळ हाणामारी
Uttar Pradesh NewsSaam Digital

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हापुडमध्ये लग्न लागताना नरदेवाने असं काही कृत्य केलं की त्यामुळे नवरी आणि नवरदेवाच्या नातेवाईकांनी एकमेकांना लाठी-काठ्यांनी मारहाण केली. नवरीच्या नातेवाईकांनी फक्त नवरदेवालाच मारहाण केली नाही तर त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या नातेवाईकांनाही चांगला चोप दिला. नवरदेवाच्या नातेवाईकांनी नवरीच्या नातेवाईकांवर दगडफेक केली. यामुळे लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. या घटनेमध्ये ६ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. हे प्रकरण पोलिस (UP Police) ठाण्यापर्यंत पोहचले असून पोलिस तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हापुड येथील अशोकनगरमध्ये लग्नसमारंभ सुरू होता. नवरदेव-नवरी एकमेकांना वरमाला घालणार होते. तेवढ्यात नवरदेवाने आपल्या होणाऱ्या बायकोला वरमाला घालण्यापूर्वी सर्वांसमोर किस केले. नवरदेवाच्या या कृतीमुळे नवरीचे नातेवाईक भडकले. त्यांनी नवरदेवासह त्याच्या सर्व नातेवाईकांना चांगलीच मारहाण केली. बघता बघता नवरा आणि नवरदेवाचे नातेवाईक आमने सामने आले.

लाठी काठ्या, सळईच्या माध्यमातून त्यांनी एकमेकांना मारहाण केली. ऐवढ्यावर न थांबतात त्यांनी दगडफेक देखील केली. नवरीच्या कुटुंबातील ६ जण या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये नवरीच्या वडिलांचा देखील समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Uttar Pradesh News: वरमाला घालताना नवरदेवाने नवरीला केलं किस, दोन्हीकडच्या वऱ्हाड्यांमध्ये तुंबळ हाणामारी
Delhi Metro: पुन्हा दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ व्हायरल; लेडीज कोचमध्ये मुलीचा अश्लील डान्स Watch video

या घटनेनंतर नवरदेव नवरीला न घेऊन जाता आपली वरात तशीच परत घेऊन गेला. या घटनेमुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली. याप्रकरणी पोलिसांनी शांतीभंग केल्याप्रकरणी कलम १५१ अंतर्गत कारवाई केली. या घटनेप्रकरणी नवरीच्या वडिलांनी सांगितले की, सोमवारी रात्री त्यांच्या दोन मुलींचं लग्न होते. मोठ्या मुलीची सुभाषनगर आणि छोट्या मुलीची शिवनगर येथून वरात आली होती. छोट्या मुलीचे लग्न लागताना गोंधळ झाला. नरदेवाने सर्वांसमोर तिला किस केले. त्यामुळे आमच्या घरातील लोकं भडकले आणि दोन्ही नातेवाईकांमध्ये वाद झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला लग्नसोहळ्यामध्ये भांडण झाल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी अद्याप नवरा आणि नवरीच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. शांततेचा भंग केल्याप्रकरणी काही जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

Uttar Pradesh News: वरमाला घालताना नवरदेवाने नवरीला केलं किस, दोन्हीकडच्या वऱ्हाड्यांमध्ये तुंबळ हाणामारी
Delhi Politics : निवडणुकीआधीच दिल्लीत मोठी घडामोड; राघव चढ्ढा लंडनहून परतताच घेतली CM केजरीवालांची भेट, चर्चा गुलदस्त्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com