Chitrakoot News: बायकोच्या मृत्यूचे वृत्त कळताच पोलिसाने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Chitrakoot Police End Life: या घटनेमुळे चित्रपकूटमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सतत होणाऱ्या भांडणांना कटाळून दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिसाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
Uttar Pradesh Crime
Uttar Pradesh CrimeSaam Tv

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) चित्रकूटमधून (Chitrakoot) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. बायकोच्या मृत्यूचे वृत्त कळताच एका पोलिस कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे चित्रपकूटमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सतत होणाऱ्या भांडणांना कटाळून दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिसाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कॉन्स्टेबल मयंक कुमार पटेल हा झाशीमध्ये तैनात होता. मयांकचे कुटुंबीय आणि त्याच्या बायकोमध्ये सतत वाद होत होते. त्यामुळे त्याच्या बायकोने टोकाचे पाऊल उचलत घरामध्येच गळफास लावून आत्महत्या केली. बायकोच्या आत्महत्येचे वृत्त कळाल्यानंतर अवघ्या एका तासांत मयांकने देखील आत्महत्या केली. मयांकने सरकारी रायफलने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या मयांकचा जागीच मृत्यू झाला.

Uttar Pradesh Crime
Baba Ramdev: पतंजलीने मागितली 67 वर्तमानपत्रांमध्ये जाहीर माफी; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

मयांक उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी लावण्यात आलेली ड्युटी संपवून घरी आला होता. पण घरामध्ये झालेल्या आपापसातील वादानंतर त्याच्या पत्नीने रात्री गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे मयांकला मोठा धक्का बसला. चिंतेत आलेला मयांक कुटुंबीयांना निवडणूक ड्युटीसाठी परत जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. पण घरापासून काही अंतर दूर गेल्यानंतर त्याने गावाच्या प्रमुखाच्या घरासमोर आत्महत्या केली. मयांकने सरकारी रायफलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

Uttar Pradesh Crime
Surat Lok Sabha Seat Results: मतदानाआधीच 'सूरत' गमावली, काँग्रेस अॅक्टिव्ह मोडमध्ये; EC कडे तक्रार

गोळीबाराचा आवाज ऐकून गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली पण तोपर्यंत मयांकचा मृत्यू झाला होता. असे सांगितले जात आहे की, बायकोच्या मृत्यूमुळे मयांकला मोठा धक्का बसला होता. तिचा मृत्यू झाल्याचे सहन न झाल्याने त्याने देखील टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. पोलिसांनी दोघांचे देखील मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. सध्या चित्रकूट पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Uttar Pradesh Crime
CM Arvind Kejriwal : तिहार तुरुंगात CM केजरीवालांना पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन, रक्तातील साखरेची पातळी किती झाली? वाचा अपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com