Uttar Pradesh News: हृदयद्रावक! मोबाईलने घेतला मुलाचा जीव, चार्जिंगला लावून बोलत असताना अचानक...

Latest Crime News: उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये ही मन सून्न करणारी घटना घडली आहे.
UP Crime News
UP Crime NewsSaam Tv
Published On: 

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) मोबाईलमुळे (Mobile) एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलत असताना अचानक इलेक्ट्रिक शॉक लागून या मुलाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये ही मन सून्न करणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

UP Crime News
Karnataka BJP Leader Killed: भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ, कर्नाटकात निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलं

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यातल्या बिसौली पोलिस (UP Police) स्टेशनच्या हद्दीतील हत्सा गावामध्ये ही घटना घडली आहे. याठिकाणी राहणाऱ्या सत्यम शर्मा या 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सत्यमने दोन दिवसांपूर्वीच मोबाईल विकत घेतला होता. बॅटरी उतरल्यामुळे त्याने चार्जिंगला मोबाईल लावला होता. सत्यमने हातामध्ये स्मार्ट वॉच देखील घातला होता. त्याचवेळी अचानक फोन आला.

UP Crime News
Dehradun News: प्रेयसीने पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुण चोरून घरी घुसला अन् खोलीत जाऊन…

फोन आल्यामुळे सत्यम मोबाईलची चार्जर पिन काढायला गेला. त्याचवेळी शॉक लागून तो जमिनीवर कोसळला. सत्यमच्या कुटुंबीयांना त्याला तात्काळ रुग्णालयात हलवले. पण डॉक्टरांनी सत्यमची तपासणी करत मृत घोषीत केले. एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्यामुळे शर्मा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

UP Crime News
Crime News: ज्याच्याशी होणार होतं लग्न त्यानेच केला घात; तरुणीला हॉटेलात बोलावलं अन्...

घटना घडली त्यावेळी सत्यम आपल्या मित्रांसोबत घरातील एका खोळीमध्ये खेळत होता. त्याच्या मित्राने सांगितले की, 'खेळत असताना सत्यमला फोन आला. तो चार्जिंगला लावलेल्या मोबाईलच्या दिशेने गेला. चार्जिंग पिन काढून मोबाईलवर बोलणारच तेवढ्यात त्याला शॉक लागला. सत्यमला ऐवढ्या जोरात शॉक लागला की तो जमिनीवर कोसळला. सत्यमचे अंग पूर्णपणे काळे पडले होते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com