चार मित्र फिरायला निघाले, चालता चालता शिंक आली अन् गमावला जीव, Video व्हायरल

तरुणाला ज्या पद्धतीने मृत्यू आला ते पाहूनच तुम्हाला धक्का बसेल.
Viral News
Viral NewsSaam Tv

मेरठ - मृत्यू कुठे आणि कसा कुणाला गाठेल हे सांगता येत नाही. अशाच एका मृत्यूचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका तरुणाला चालता चालता शिंक आली आणि तो जागेवरच कोसळला. मृत्यूची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमध्ये घडली आहे.

Viral News
Crime News : तू माझी झाली नाहीस तर कुणाचीच होऊ देणार नाही; एकतर्फी प्रेमातून तरुणाचा गोंधळ

या व्हिडीओमध्ये 4 मित्र एकत्र बोलत फिरताना दिसत आहेत. तेवढ्यात एका तरुणाला शिंक आली आणि तो तिथेच पडला. तरुणाला ज्या पद्धतीने मृत्यू आला ते पाहूनच तुम्हाला धक्का बसेल. मित्रांसोबत मजामस्ती करत हा तरुण चालत होता. एक शिंक आली आणि काही वेळातच त्याचा जीव गेला.

हे संपूर्ण प्रकरण मेरठच्या किडवाई नगरचे आहे. गेल्या शुक्रवारी २ डिसेंबर रोजी चार मित्र लोकलमधील एका रस्त्यावरून जात होते. चौघेही आपापसात बोलत फिरत होते. दरम्यान, एका तरुणाला शिंक येते, शिंक आल्यानंतर तरुणाने मित्राच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो घसरला आणि रस्त्यावर पडला.

बाजूने चालणाऱ्या मित्रांनी त्यादरम्यान मुलाचे हातपाय चोळण्यास सुरुवात केली. शरीरात कोणतीही हालचाल न झाल्याने त्याबी आरडाओरड सुरू केला. आवाज ऐकून लोक घरातून बाहेर आले. स्थानिक लोक आणि मित्रांच्या मदतीने मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या तरुणाला हार्ट अटॅक आल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com