मुलाच्या अंगात राक्षस शिरला, आई अन् बायकोला दगडानं ठेचलं, मांस खाल्ला; हैवानी कृत्य बघून अख्खं गाव हादरलं

Kushinagar Double Murder Case Full Details: उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाने आई आणि पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Police investigation underway at the crime scene in Kushinagar where a man brutally killed his mother and wife.
Police investigation underway at the crime scene in Kushinagar where a man brutally killed his mother and wife.Saam Tv
Published On

उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील परसा गावातील दुहेरी हत्याकांडानं अख्खं राज्य हादरलं. नशेच्या आहारी गेलेल्या नराधमानं जन्मदात्या आईला आणि जिच्यासोबत साताजन्माची गाठ बांधलीये, त्या बायकोला दगडानं ठेचलं. त्या दोघींची निर्घृण हत्या केली. या क्रूर हत्याकांडानंतर तो इतक्यावरच थांबला नाही. त्यानं केलेल्या कृतीनं अख्खं गाव सुन्न झालं. या दोघींच्या हत्येनंतर तो विकृतपणे त्यांच्या मांसाचे तुकडे खायला लागला.

Police investigation underway at the crime scene in Kushinagar where a man brutally killed his mother and wife.
Crime News : धक्कादायक! क्रूर आई-बापानंच केली पोटच्या ६ वर्षांच्या मुलीची हत्या, कारण वाचून डोक्यात तिडीक जाईल

तसेच छतावरून तुकडे फेकू लागला. याबाबत गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन नशेखोर तरुणाला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर गुप्ता असं या विकृत तरुणाचं नाव आहे. तो घराच्या छतावर बायकोसोबत होता. थंडीचे दिवस असल्यानं शेकोटी पेटवली होती.

Police investigation underway at the crime scene in Kushinagar where a man brutally killed his mother and wife.
राज्यात मोठी खळबळ! तब्बल 70 टक्क्यांहून अधिक मंत्र्यांची खुर्ची जाणार ? या आमदारांना संधी मिळण्याची शक्यता

अचानक त्यानं दोघांमधलं जुनं भांडण उकरून काढलं. जोरदार वाद झाला. सनकी सिकंदरनं बायकोच्या डोक्यात दगड घातला. ती क्षणार्धात खाली कोसळली. त्यानंतर विकृतानं क्रौर्याची सीमा ओलांडली. त्याच दगडात तिचं डोकं ठेचायला लागला. ती जोरजोरात ओरडत होती. हा आवाज काळीज पिळवटून टाकणारा होता. इतक्यात त्याची आई धावत आली.

तिनं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. या सनकी मुलाने कुठलाही विचार न करता आईच्या डोक्यावर देखील दगड घातला आणि ती आई जागीच जमिनीवर कोसळली. त्याने दोघांची डोकी दगडाने ठेचली. दोघींचाही जागीच मृत्यू झाला.

Police investigation underway at the crime scene in Kushinagar where a man brutally killed his mother and wife.
Crime News : गुप्त माहिती मिळवली, खासदाराला ब्लॅकमेल करून ५ लाखांची खंडणी मागितली; बोगस आयटी कर्मचाऱ्याला अटक

राक्षसी कृत्यानं सगळेच हादरले

दोघींच्या हत्येनंतर विकृत सिकंदर थांबला नाही. दोघींच्या मृतदेहाच्या मांसाचे तुकडे त्यानं चावून खाल्ले. त्यानंतर त्या नराधमानं छतावरून इकडे तिकडे फेकले. हा सगळा प्रकार बघून शेजार-पाजारचे हादरून गेले. स्थानिकांनी अहिरौली बाजार पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कुशीनगरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सिद्धार्थ वर्मा, विभागीय अधिकारी कस्य कुंदन सिंह, अहिरौली बाजार पोलीस ठाण्याचे प्रमुख प्रवीण राय, फॉरेन्सिक टीमचे श्री प्रकाश राय त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले.

दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. सिकंदर हा अंमली पदार्थाचे सेवन करत होता. तो पूर्णपणे नशेच्या आहारी गेला होता. तो नेहमी नशेत असायचा. कौटुंबिक हिंसाचारातून त्याने हे कृत्य केले असावे, असा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com