Crime News
Crime NewsSaam TV

Uttar Pradesh Crime News: व्यसनाधीन भावासाठी बहिणीनं उचललं टोकाचं पाऊल; घराचं दार बंद केलं अन्... पुढे काय घडलं?

Ghaziabad News : भावाचे व्यसन सोडवण्यासाठी बहिणीने टोकाचं पाऊल उचललं.
Published on

Uttar Pradesh : अमली पदार्थांचे सेवन हे आरोग्यासाठी हानिकारक असते. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला गंभीर आजार होऊ शकतो. तर अनेकदा या व्यक्तींना मृत्यूलाही तोंड द्यावे लागते. सध्याची तरुण पिढी अशा व्यसनांच्या आहारी चालली आहे. (Latest Marathi News)

जगभरात अमली पदार्थ घेणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. अमली पदार्थ घेण्यावर बंदी असली तरी त्याच्या आहारी गेलेले लोक अनधितकृतपणे त्याचे सेवन करतात. अमली पदार्थच्या व्यसनामुळे अनेक तरुण मुलांचे आयुष्य उद्धवस्त होताना दिसत आहे.

Crime News
Satara Accident News : वाईत बसच्या चाकाखाली सापडून सातवीतील मुलीचा दुर्दैवी मृत्यू

अमली पदार्थांचे सेवन करण्यात सर्वात जास्त तरुणाईचा समावेश आहे. अशातच भावाचे व्यसन सोडण्यासाठी अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. भावासाठी हे टोकाचे पाऊस उचलल्यामुळे आसपासच्या परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.

सदर घटना गुरुवारी उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये घडली आहे. मुलीची आई घरी परतली तेव्हा घराचे दार बंद होते. आईने दरवाजा वाजवून लेकीला आवाज दिला. परंतु घरातून काहीच प्रतिसाद न आल्याने आईने शेजाऱ्यांना सांगितले. शेजाऱ्यांनीही प्रयत्न करुन घराचा दरवाजा न उघडल्यामुळे अखेर पोलिसांना फोन केला.

Crime News
Kalyan Crime News : शेजाऱ्यांचं भांडण सोडवायला गेला; तरुणाने भावाच्या मित्राच्या कानाचा चावा घेत तुकडाच पाडला

यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लॅच तोडून घरात प्रवेश केला. यावेळी त्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.पोलिसांनी तातडीने मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र,डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतंत्र कुमार सिंह यांनी दिली. या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

भिंतीवर आत्महतेची चिठ्ठी

या सर्व प्रकरणात मुलीने आत्महतेची चिठ्ठी भितींवर चिटकवली होती. या चिठ्ठीमध्ये त्या मुलीने आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरलं नव्हतं.'मी आत्महत्या करतेय, किमान यामुळे तरी माझा भाऊ अमली पदार्थांचे व्यसन सोडेल'. असं तिने त्या चिठ्ठीमध्ये लिहलं होतं. भावाचे व्यसन सोडण्यासाठी उचलेल्या या टोकाच्या पाऊलामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com