Ballia Boat Accident: उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना; गंगा नदीत 40 जणांनी भरलेली बोट उलटली

उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना; गंगा नदीत 40 जणांनी भरलेली बोट उलटली
Ballia Boat Accident
Ballia Boat AccidentSaam Tv

Uttar Pradesh Boat Accident: उत्तर प्रदेशातील बलिया येथे गंगा नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला. तर चार महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताच्या वेळी बोटीत 40 हून अधिक लोक होते.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बलिया येथे सोमवारी फेफना पोलिसस्टेशन हद्दीत ही दुर्घटना घडली. येथे गंगा मदी माल्देपूर घाट येथून जात होती, ती नदीमध्ये उलटली. या घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावर उपस्थितांकडून बोटीत ४० लोक होते असे सांगितले जात आहे. या दुर्घटनेनंतर लगेच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं.  (Latest Marathi News)

Ballia Boat Accident
Sameer Wankhede Latest News: मोठी बातमी! समीर वानखेडे यांना ८ जूनपर्यंत दिलासा कायम, पण घातल्या 'या' अटी

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ३५ ते ४० जण बोटीत बसून नदीच्या दुसऱ्या टोकाकडे जात होते, त्याचवेळी नदीत बोटीचा स्फोट झाला. ओव्हरलोडिंगमुळे जुन्या बोटीचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी बोटीमध्ये महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने होती. (UTTAR PRADESH)

Ballia Boat Accident
Sanjay Raut News Today: २०२४ मध्ये ED कार्यालयात कोणाला पाठवायचं याच्या याद्या तयार करू; संजय राऊतांच्या विधानानं खळबळ

जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''बलियामध्ये इंजिनमध्ये बिघाड आणि जोरदार वाऱ्यामुळे बोट असंतुलित होऊन उलटून ती महिलांचा मृत्यू झाला. बोट उलटल्याची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. चार महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोटीखाली कोणीही अडकले नसल्याची खात्री होईपर्यंत बचावकार्य सुरूच राहील.''

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com