G20 Summit India: भारत-अमेरिका संबंध होणार आणखी दृढ; बायडन भारतात दाखल, PM मोदींशी 'या' महत्वाच्या मुद्द्यावर होणार चर्चा

G20 Summit in Delhi: अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन ३ दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले आहे.
 Joe Biden's India Visit For G-20 Summit
Joe Biden's India Visit For G-20 SummitSaam tv
Published On

Joe Biden India Visit For G-20 Summit:

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन ३ दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले आहे. दिल्लीच्या पालम विमानतळावर त्यांच्या विमानाचं लँडिग झालं आहे. जो बायडन यांची काही वेळातच पंतप्रधानांच्या निवासस्थानी नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. (Latest Marathi News)

'दैनिक भास्कर'च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेचे एनएसए जेक सुलविन यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशादरम्यान नागरी आण्विक तंत्रज्ञानामध्ये सहाकार्य वाढविण्यासाठी चर्चा होणार आहे. तसेच लहान मॉड्यूलर अणुभट्ट्यांवरही करार होण्याची शक्यता आहे. तसेच दोघांमध्ये जेई जेट इंजिन डीलवर चर्चा होऊ शकते.

 Joe Biden's India Visit For G-20 Summit
Sambhaji Raje News: २ मुलांनी आत्महत्या केल्याने माझं मन व्यथित; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांचं मोठं भाष्य

दोन्ही देशाच्या प्रमुख नेत्यांमध्ये रशिया-युक्रेन युद्धावरही चर्चा होऊ शकते. आर्थिक आणि सामाजिक पातळीवर युद्धाचा परिणाम कमी कसा करता येईल, याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

'व्हाईट हाऊस'च्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची गरीबी आणि इतर समस्यांशी लढण्यासाठी जागतिक बँकेसहित मल्टीलेटरल डेव्हलेपमेंट बँकेची क्षमता वाढविणे आणि जागतिक समस्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

जो बायडन भारतात येणारे अमेरिकेचे ८ वे राष्ट्राध्यक्ष आहेत. भारताच्या स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्या पन्नास वर्षात अमेरिकेचे ३ राष्ट्राध्यक्ष भारतात येऊन गेले होते. गेल्या २३ वर्षात अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांचा सहावा दौरा आहे.

 Joe Biden's India Visit For G-20 Summit
Rahul Gandhi Belgium: मोदी सरकारच्या या निर्णयाचं राहुल गांधींनी केलं समर्थन, म्हणाले- मला वाटतं विरोधक...

अमेरिकेचे माजी ड्वाइट आइजनहावर यांचा दौरा कसा होता?

ड्वाइट आइजनहावर हे भारतात दौरा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. भारतात प्रचंड महागाई असताना ड्वाइट आइजनहावर भारताच्या दौऱ्यावर होते. डिसेंबर ,१९५९ मध्ये आले होते.

ड्वाइट आइजनहावर भारताच्या दौऱ्यावर होते, तेव्हा जगात शीतयुद्ध सुरू होतं. त्यावेळी भारताने अमेरिका आणि सोवियत संघ या दोघांपैकी कोणालाही पाठिंबा दिला नव्हता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com