Shocking : दत्तक मुलांवर लैंगिक अत्याचार; समलैंगिक जोडप्याला १०० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

shocking crime in US : अमेरिकेत दत्तक मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना १०० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
us Crime
us Crime
Published On

Gay Couple Sentence 100 Year Jail: अमेरिकेच्या जॉर्जियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जॉर्जियामध्ये एका समलैंगिक जोडप्याला १०० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या समलैंगिक जोडप्याने त्यांच्या दत्तक दोन मुलांवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. या जोडप्याने हा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड देखील केला आहे. तसेच त्यांच्या मित्रांनाही दाखवला. या खळबळजनक प्रकारानंतर जॉर्जिया परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

समलैंगिक जोडप्याने केलेल्या कृत्याचा प्रकार हा २०२२ साली झाला होता. २०२२ साली गुगलवर एक खात्यावर अत्याचाराच्या घटनेचे व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरु केला. त्यावेळी जैचरी जुलॉक नावाच्या व्यक्तीने व्हिडिओ दिल्याचे चौकशीत सांगण्यात आले.

us Crime
Kalyan Crime : खाऊ घ्यायला गेली, पुन्हा परतलीच नाही; कल्याणमधील १३ वर्षीय बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला

सत्य कसं समोर आलं?

द न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरुच ठेवला आहे. जुलॉक आणि विलियम डेल हे दोघे समलैंगिक आहेत. त्यांनी दोन मुलांना दत्तक घेतलं होतं. एक मुलगा १० वर्षाचा होता. तर दुसरा मुलगा १२ वर्षाचा होता. या जोडप्याने दोघांना बंदिस्त ठेवलं होतं. त्यानंतर त्यांचं घरात शोषण करत होते. चौकशी दरम्यान, लॉसेसने दावा केला की, जुलॉक त्याला स्नॅपचॅटवर मुलांचं शोषण करण्याचा सल्ला द्यायचा. त्याने एका मेसेजमध्ये त्याबाबत लिहिलं होतं. जुलॉकने रिकॉर्ड केलेला व्हिडिओ देखील त्याला पाठवला होता. त्यानंतर गुगल लिंकच्या माध्यमातून पाठवण्यात आला होता.

us Crime
Dombivali Crime : डोंबिवली स्टेशन परिसरात दहा दुकानांमधून लाखोंचा मुद्देमाल लंपास; पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरची घटना

मिळाली १०० वर्षांची शिक्षा

दोन्ही मुलांना एक संस्थेच्या माध्यमातून दत्तक घेतलं होतं. समलैंगिक जोडपे हे चांगल्या ठिकाणी काम करत होतं. जुलॉक एका बँकेत काम करत होता. तर त्याचा साथीदार विलियम डेल हा सरकारी कर्मचारी होता. डेल आणि जुलॉक या दोघांना विना पॅरोलची एकूण १०० वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. या धक्कादायक कृत्यानंतर संपूर्ण जगात चर्चा होत आहे. सोशल मीडियावर या समलैंगिक जोडप्याला आणखी कठोर शिक्षा द्या, अशी मागणी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com