Donald Trump Vs Kamala Harris: अबकी बार ट्रम्प सरकार! डोनाल्ड ट्रम्प ४७ वे अध्यक्ष होणार, रिपब्लिकनने गाठला बहुमताचा आकडा

US Election Result 2024: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी किमान २७० मतांची आवश्यकता होती. ट्रम्प यांनी बहुमताचा आकाडा पार केला आहे. त्यामुळे तेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत.
Donald Trump Vs Kamala Harris: अबकी बार ट्रम्प सरकार! डोनाल्ड ट्रम्प ४७ वे अध्यक्ष होणार, रिपब्लिकनने पार केला बहुमताचा आकडा
Court Ban Donald Trump To Election ContestSaam Digital
Published On

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सिनेटमध्ये बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीच्या निकालामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत २७७ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी किमान २७० मतांची आवश्यकता होती. ट्रम्प यांनी बहुमताचा आकाडा पार केला आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरीस यांना २२६ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्र्मप यांनी पुन्हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. फॉक्स न्यूजनुसार, पॉप्युलर व्होटमध्ये ट्रम्प यांचा विजय ऐतिहासिक आहे. कारण गेल्या २० वर्षांत रिपब्लिकन पक्षाचा कोणताही उमेदवार असे करू शकला नाही.

Donald Trump Vs Kamala Harris: अबकी बार ट्रम्प सरकार! डोनाल्ड ट्रम्प ४७ वे अध्यक्ष होणार, रिपब्लिकनने पार केला बहुमताचा आकडा
US Elections : भारतात जन्मले, अमेरिकी निवडणुकीत ठरले किंग; राजा कृष्णमूर्ती सलग दुसऱ्यांदा जिंकले!

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जनतेला संबोधित करताना 'अमेरिकेसाठी हा सुवर्णकाळ असेल.', अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पुढे सांगितले की, 'आपण आपल्या देशाला व्यवस्थित करण्यासाठी मदत करूया. मी प्रत्येक नागरिक, तुम्ही आणि तुमच्या परिवारासाठी लढेल. हा एक राजकीय विजय आहे जो आपल्या देशाने याआधी कधीही पाहिला नाही, असे काहीही नाही. ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिल्याबद्दल मला अमेरिकन जनतेचे आभार मानायचे आहे.'

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे सांगितले की,'आपल्या देशातील प्रत्येक नागरिक, तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी मी लढेन. दररोज मी माझ्या प्रत्येक श्वासाने तुमच्यासाठी लढेन. अमेरिका मजबूत, सुरक्षित आणि समृद्ध होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. हा खऱ्या अर्थाने अमेरिकेचा सुवर्णकाळ असेल.', असे ट्रम्प यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

Donald Trump Vs Kamala Harris: अबकी बार ट्रम्प सरकार! डोनाल्ड ट्रम्प ४७ वे अध्यक्ष होणार, रिपब्लिकनने पार केला बहुमताचा आकडा
US Election Result 2024: डोनाल्ड ट्रम्प Vs कमला हॅरिस, आतापर्यंत कोणत्या राज्यात कोण विजयी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com