इराणविरोधातल्या युद्धात अमेरिकेची उडी?अमेरिका उडवणार फोर्डो अणूकेंद्र? B-2 अणुबॉम्बर्सने घेतलं उड्डाण

Israel-Iran War Escalates: इस्त्राईलच्या नाकात दम आणल्याने इराणविरोधात अमेरिका मैदानात उतरलीय... तर अमेरिकेने थेट इराणचं गुप्त अणुकेंद्र फोर्डोच उध्वस्त करण्याची योजना आखलीय... त्यासाठी अमेरिकेच्या बी 2 अणुबॉम्बर्सने उड्डाण घेतलंय... मात्र या बी-2 अणुबॉम्बर्सचं वैशिष्ट्ये काय आहे?पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
US Air Force’s B-2 stealth bombers take flight from Missouri, reportedly headed towards Iran’s Fordow nuclear facility amid rising Middle East tensions.
US Air Force’s B-2 stealth bombers take flight from Missouri, reportedly headed towards Iran’s Fordow nuclear facility amid rising Middle East tensions.saam tv
Published On

इराण- इस्त्राईल युद्धाने भीषण रुप धारण केलंय.. एकमेकांवर जोरदार मिसाईल हल्ले केले जात आहे.. मात्र इराणच्या हल्ल्यांनी इस्त्राईल घायाळ झालाय... तर नेत्यान्याहूंनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे लोटांगण घातलंय.. त्यामुळे या युद्धात अमेरिकेने उडी घेतलीय.. तर अमेरिकेने बी-2 स्टिल्थ बॉम्बर्स पाठवून इराणचं सर्वात मोठं फोर्डो अणुकेंद्र उडवून देण्याची रणनीती आखलीय...त्यासाठी बी-2 बॉम्बर्सने अमेरिकेच्या मिसौरीमधून उड्डाण घेतलंय.. त्यामुळे बी-2 बॉम्बर्स इराणचा काळ बनण्याची शक्यता वर्तवली जातेय.. मात्र या बी-2 स्टिल्थ बॉम्बर्सची वैशिष्ट्ये काय आहेत? पाहूयात....

बी-2 स्टिल्थ बॉम्बर्सची वैशिष्ट्ये (HEADER)

अण्वस्त्र किंवा संवेदनशील भागात हल्ल्यासाठी वापर

रडारला चकमा देण्याची क्षमता

1 हजार 10 किमी प्रति तास वेगाने मारा कऱण्यास सक्षम

11 हजार किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता

पारंपरिक आणि अणुबॉम्बसह मारा करण्याची क्षमता

इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत असल्याच्या संशयातून इस्त्राईलने इराणवर हल्ला केला आणि युद्धाला तोंड फोडलं..तर याच दरम्यान इराणमध्ये 5.1 रिश्टर स्केलच्या भुकंपाचे 2 धक्के बसलेत.. मात्र हा भुकंप नसून न्यूक्लियर ब्लास्टचा संशय व्यक्त करण्यात येतोय... त्यामुळेच अमेरिकेने आता हिंदी महासागरातील डिएगो गार्सिया एअरबेसचा वापर करण्याची शक्यता आहे... एवढंच नाही आता पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरला अमेरिकेने पायघड्या घातल्या... त्यानंतर आता पाकिस्तानने आपली हवाई हद्द खुली केलीय.. त्यामुळे धर्माचा आधार घेत इस्त्राईलविरोधात अणुयुद्धाचा इशारा देणाऱ्या पाकिस्तानने सरड्याला लाजवेल असा रंग बदललाय.. अमेरिका आता इराणविरोधात बी-2 बॉम्बर डागण्यासठी पाकिस्तानी एअरबेसचा वापर करण्याची शक्यता आहे...मात्र जमीनीखाली 90 मीटर खोल असलेलं फोर्डो अणुकेंद्र अमेरिकी हल्ल्यांनी उद्ध्वस्त होणार की पाकिस्तानसह अमेरिकाही इराण इस्त्राईल युद्धात सपाटून मार खाणार? याकडे जगाचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com