Budget 2023
Budget 2023Saam Tv

Budget 2023 : मोबाइल, टीव्ही अन् बरंच काही; वाचा काय स्वस्त आणि काय झालं महाग?

India Budget 2023: या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
Published on

Union Budget 2023 Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमध्ये कपात ही सर्वात मोठी घोषणा आहे. सरकारने जुनी करप्रणाली रद्द केली. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी कोणत्या वस्तू स्वस्त केल्या आणि कोणत्या वस्तू महाग झाल्या हे देखील सांगितले आहे. जाणून घेऊया कोणत्या वस्तू स्वस्त होतील आणि कोणत्या वस्तूंवर जास्त पैसे मोजावे लागतील. 

Budget 2023
Maharashtra Politics : मातोश्री आमच्यासाठी मरेपर्यंत देवस्थान; शिंदे गटाच्या आमदाराचे मोठे विधान

काय स्वस्त होणार?

  • एलईडी टीव्ही

  • टीव्हीचे सूटे भाग

  • इलेक्ट्रिक वस्तू

  • मोबाईल फोन, पार्ट्स

  • इलेक्ट्रिक वाहने

  • खेळणी

  • कॅमेरा लेन्स

  • बायो गॅसशी संबंधित गोष्टी

  • सीमाशुल्क 13 टक्के करण्यात

  • बॅटरीवरील आयात शुल्क कापले

Budget 2023
Nagpur News: ७ लाखाचे ५३ मोबाईल हरविले; पोलिसांकडून शोध करत मूळ मालकांना परत

काय महागणार?

  • सोन्याचे दागिने

  • चांदीचे दागिने

  • चांदीची भांडी

  • स्वयंपाकघरातील चिमणी महाग

  • सिगरेट

अर्थसंकल्पातील ७ प्राधान्यक्रम यावेळी अर्थमंत्र्यांनी (Nirmala Sitharaman) सांगितले. सर्वांच्या सहभागासह विकास (ज्यामध्ये वंचितांसह सर्वांना प्राधान्य दिले जाईल), शेतीसाठी डिजिटल पायाभूत सुविधांना चालना, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न, क्षमतांचा पूर्ण वापर, शाश्वत ऊर्जेकडे वाटचाल करण्याचे प्रयत्न, आर्थिक क्षेत्र आणि युवक विशेष लक्ष यावर अधिक भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com