Udaipur Murder Case : उदयपूरमधील निर्घृण हत्येप्रकरणी UAPA नुसार गुन्हा दाखल; तपास NIA कडे

Rajasthan Murder Case Viral News: प्राथमिक तपासात ही घटना दहशत पसरवण्याच्या उद्देशाने घडल्याचे समोर आले आहे. या दोन्ही आरोपींच्या अन्य देशांतील संपर्कांचीही माहिती समोर आली आहे.
Udaipur Murder Case :  Riyaz and Ghouse Mohammed,
Udaipur Murder Case : Riyaz and Ghouse Mohammed,Twitter/@ANI
Published On

उदयपूर, राजस्थान: राजस्थान राज्यातील उदयपूर (Udaipur) येथे झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी (Murder) आता एनआयए (National Investigation Agency - NIA) तर्फे तपास करण्यात येणार आहे. उदयपूमध्ये कन्हैयालाल नावाच्या टेलरची दोन मुस्लिम युवकांकडून भरदिवसा दुकानात शिरुन गळा कापून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे राजस्थानमध्ये (Rajasthan) धार्मिक तणाव वाढला आहे. त्यामुळे या हत्येबाबतचा अधिक तपास आता केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयएकडे सोपवला आहे. (Udaypur Murder Cace)

हे देखील पाहा -

उदयपूर हत्याप्रकरण नेमकं काय आहे ?

१० दिवसांपूर्वी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या कन्हैयालालची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. मंगळवारी भरदिवसा गौस आणि रियाझ हे दोन मुस्लिम युवक कन्हैयालालच्या दुकानात घुसले आणि त्याच्यावर तलवारीने अनेक वार करून त्याचा गळा चिरला. यावेळी दुकानात असलेला ईश्वर या कर्मचाऱ्यासह अन्य दोन कर्मचारी उपस्थित होते. मंगळवारी पोलिसांनी गौस मोहम्मद आणि रियाज जब्बार या दोन्ही आरोपींना राजसमंद येथून अटक केली. याशिवाय अन्य ३ जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये पोलिसांत तक्रार करणारा कन्हैयालालचा शेजारी नाझीमही आहे. या हत्येचा तपास आता एनआयएने ताब्यात घेतला असून दोन्ही मारेकऱ्यांविरुद्ध यूएपीए (THE UNLAWFUL ACTIVITIES (PREVENTION) ACT, 1967. UAPA) कायद्यासह आयपीसीच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनआयए या हत्येची दहशतवादी घटना म्हणून तपास करत आहे.

दोन्ही आरोपींचा इतर देशांशी संपर्क

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज (मंगळवारी) उदयपूर घटनेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात ही घटना दहशत पसरवण्याच्या उद्देशाने घडल्याचे समोर आले आहे. या दोन्ही आरोपींच्या अन्य देशांतील संपर्कांचीही माहिती समोर आली आहे. उदयपूरच्या घटनेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास NIA करेल. ज्यामध्ये राजस्थान एटीएस पूर्ण सहकार्य करेल.

Udaipur Murder Case :  Riyaz and Ghouse Mohammed,
घरात झोपलेल्या सावत्र आईसोबत मुलाचं भयंकर कृत्य; पुण्यातील थरारक घटना
हत्येशी संबंधित अपडेट्स

1. पोलिसांनी शहरातील ७ भागात खबरदारी म्हणून संचारबंदी लागू केली आहे. दुसरीकडे, राजस्थानमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट २४ तासांसाठी बंद करण्यात आले आहे. एका महिन्यासाठी कलम 1१४४ लागू करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ उदयपूर, झालावाड, डुंगरपूर, राजसमंदसह अनेक शहरे बंद आहेत.

2. गृह मंत्रालयाने या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवला. कोणतीही संघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंधांची कसून चौकशी केली जाईल, असे सांगितले. तपासासाठी ४ सदस्यांचे पथक उदयपूरला पोहोचले आहे.

3. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. दुसरीकडे, विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया हेही कन्हैयालालच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी उदयपूरला पोहोचले. गुन्हेगारांमध्ये आता भीती उरली नसल्याचे ते म्हणाले.

4. कन्हैया हत्या प्रकरणावर भाजप खासदार राज्यवर्धन सिंह राठोड म्हणाले की, ही सामान्य घटना नाही, ही एक दहशतवादी घटना आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com