Elon Musk News: मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी त्यांच्या घोषणेनुसार लेगसी व्हेरिफाईड अकाउंटवरील ब्लू टिक्स काढून टाकले आहेत. 20 एप्रिलनंतर ज्यांनी पेड सब्सस्क्रिशन घेतले नाहीत, त्यांची ब्ल्यू टिक हटवली जाईल, असं एलन मस्क यांनी म्हटलं होतं. त्यानुसार गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासूनच ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे.
त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेता शाहरुख खान यांच्यासह अनेक दिग्गजांच्या ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे. गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासूनच हा नियम लागू करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
ट्विटरच्या (Twitter) नवीन नियमांनुसार, एलन मस्क (Elon Musk) यांनी 12 एप्रिल रोजी लीगेसी व्हेरिफाईड ब्ल्यू टिक हटवण्याची घोषणा केली होती. 20 एप्रिलनंतर लीगेसी व्हेरिफाईड ब्ल्यू टिक मार्क व्हेरिफाइड अकाऊंटवरून हटवली जाईल, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार कालं रात्रीपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता कुणालाही ब्ल्यू टिक हवी असेल तर त्यासाठी तुम्हला दर महिन्याला पैसे मोजावे लागणार आहे.
ब्ल्यू टिक कशी मिळणार?
ब्ल्यू टिक हवा असेल किंवा आताची ब्ल्यू टिक कायम ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. भारतात ट्विटर ब्ल्यूचे सब्सस्क्रिप्शन 650 रुपये एवढे आहे. तर मोबाईल यूजर्ससाठी दरमहिन्याला 900 रुपये मोजावे लागणार आहेत.
जाणून घ्या कोणाच्या अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवले!
यामध्ये अभिनेते, खेळाडू, राजकारणी यांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार ते क्रिकेटपटू विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी आणि भारतीय राजकारणातील मोठी नाव विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवण्यात आली आहे.
याआधी ट्विटरची पॉलिसी काय होती?
यापूर्वी, ट्विटर राजकारणी, अभिनेते, पत्रकारांसह सेलिब्रिटींच्या अकाऊंटला ब्लू टिक देत असे. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हते, मात्र इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.