Turkey Earthquake Update: तुर्कस्तानमध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर; भूकंपातील मृतांचा आकडा ३५०० वर, बचावकार्य सुरु

Turkey Earthquake
Turkey Earthquake AFP News Agency
Published On

Earthquake News: तुर्कस्तान आणि सीरियासह चार देश भूकंपामुळे हादरले आहेत. तुर्कस्तानमधील नुरदगीपासून २३ किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचा परिणाम सीरियापर्यंत दिसून आला. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या.

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.८ इतकी मोजली गेली. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तुर्कीमध्ये आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे देशाची मोठी हानी झाला आहे. यामुळे सरकारकडून सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Turkey Earthquake
Turkey Earthquake Video : 'मला वाचवा...; जीवाच्या आकांताने ओरडतोय ढिगाऱ्याखाली अडकलेला तरुण, पाहा व्हिडिओ

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात झालेल्या लोकांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला. यासोबतच भारतानेही या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

Turkey Earthquake
Turkey Earthquake Update: निसर्गाचा कोप! तुर्कस्तान भूकंपातील मृतांचा आकडा 750च्या वर, दहा शहरं उद्ध्वस्त

भूकंपात दोन्ही देशांमध्ये ३८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून ६००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. तुर्कस्तानमधील काही भागात हवामानात अचानक बदल झाला आहे, ही चिंतेची बाब आहे.

बर्फवृष्टी सुरू झाल्याने बचाव कार्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. या थंडीमुळे ढिगाऱ्यांमध्ये अडकलेल्या लोकांना आणखी कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.

भारताकडून मदतीचा हात

सर्वाधिक नुकसान एपिसेंटर तुर्किये आणि सीरिया देशात झाल्याची माहिती समोर येत आहे. भूकंपग्रस्त देशातील जनतेला मदत करण्यासाठी भारत यूरोपियन यूनियनच्या सोबत मदत पाठवणार आहे.

भारत पाठवत असलेल्या विशेष मदतीत प्रशिक्षित डॉग स्क्वॉड आणि आवश्यक उपकरणांसह 100 कर्मचारी असलेली NDRF च्या 2 टीम पाठवणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com