महायुद्धाचा काउंटडाउन सुरु? ट्रम्पची धमकी, खोमेनी बंकरमध्ये?

Trump Iran Attack Threat Khamenei Bunker Security: व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर आता ट्रम्पनं इराणवर हल्ल्याची तयारी सुरु केलीय... अशातच अमेरिकेच्या निशाण्यावर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी आहेत. त्यामुळे इराणच्या लष्कराने खोमेनी यांच्या भोवती कसं सुरक्षा कवच उभारलंय.
Security forces stand guard amid reports of heightened protection around Iran’s Supreme Leader as tensions with the US escalate.
Security forces stand guard amid reports of heightened protection around Iran’s Supreme Leader as tensions with the US escalate.Saam Tv
Published On

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चाललीय...अशातच अमेरिकेनं इराणला दिलेल्या धमकीमुळे इराणमध्ये भीतीचं वातावरण पसरलयं... अमेरिकेचे नवे F35 लढाऊ विमानं इस्रायलमध्ये दाखल झालं असून USS अब्राहम लिंकन 90 ही विमानवाहू युद्धनौकाही इराणच्या लष्करी तलांना लक्ष्य करण्यासाठी सज्ज झालीय... त्यामुळे इराण अमेरिकेच्या हल्ल्यापासून स्वत:ची आणि सर्वोच्च नेत्याची सुरक्षा करण्यासाठी काय तयारी करतोय?

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांना तेहरानमधील एका बंकरमध्ये लपवण्यात आलयं...हे बंकर अत्यंत सुरक्षित असून या बंकरमध्ये एकमेकांशी जोडलेले बोगदे आहेत. तर दुसरीकडे अयातुल्ला खोमेंनीचा मुलगा मसूद खोमेंनीला इराणची जबाबदारी सोपवण्यात आलीय...सरकार आणि इराणच्या सर्वोच्च नेत्यामध्ये मसूद संपर्क घडवून आणतोय

दरम्यान जॉर्डनमध्ये अमेरिकेनं लढाऊ विमानं तैनात केल्यानं इराणच्या हवाई संरक्षणाला भेदणं अमेरिकेसाठी शक्य होणार आहे. दुसऱीकडे चीनने इराणला लष्करी मदत पाठवल्याची चर्चा आहे.. त्यामुळे इराणमधील या गुप्त बंकरमधून खोमेंनीचे अपहरण करणं अमेरिकेला शक्य होणार का? याकडे जगाचं लक्ष लागलयं....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com